राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने निवेदन*.. चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा मागणी

 



*राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने निवेदन*.. चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा मागणी

विचखेडा ,ता.चोपडा दि.०२(प्रतिनिधी चंद्रकांत पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने आज  दिनांक २/१०/२०२१ रोजी मा.श्री. तहसीलदार साहेब अनिल जी गावित यांना निवेदन देण्यात आले की जळगाव जिल्हा मधून चोपडा तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. तो या मधून वगळण्यात आलेला आहे तरी सदर परिस्थिती बघता चोपडा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे तरी सदर ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा असे चोपडा तालुका पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांचा नारा आहे तरी आपण या निवेदना द्वारे चोपडा तालुका समाविष्ट करण्यात यावा व शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे व दोंदवाडे ग्रा.पंचायत सरपंच सौ प्रभावती हंसराज पाटील उपसरपंच श्री मनोज युवराज पाटील व ग्रामस्थ यांच्या वतिने निवेदन देण्यात अाले 

याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री.राजेद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष श्री मनोज पाटील राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष समाधान माळी राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष मयुर पाटील,जगदिश निंबा पाटील तसेच ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील सुनील तुकाराम पाटील समाधान माळी त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकरते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने