*धुळ्याचा असिम खानचे युपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश ..चोपड्याच्या सुरमाज फाउंडेशनने केले घरी जाऊन जोरदार अभिनंदन..*
चोपडा दि.०२(प्रतिनिधी) : धुळे येथील मुस्लिम समाजातील सामान्य कुटुंबातील असिम किफायत खान यांनी युपीएससी परिक्षेत ५५८ रॕंंक गुण मिळवत उत्तुंग यश संपादन केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी चोपड्याच्या सुरमाज फाउंडेशनने धुळे येथे जाऊन गौरव केल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात भर टाकुनी उत्साह द्विगुणित केला.
याबाबत अधिक माहिती अशी,मुस्लिम समाजातील मूल. ज्याने आपले शिक्षण उर्दू भाषेत पूर्ण केले. आणि सामान्य कुटुंबाचा असून ज्याचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि आई एक साधी घरकामगार आहे. ते मूल आपल्या महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यात राहणारा असीम किफायत खान आहे हा आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांने 2020 ची UPSC परीक्षा संपूर्ण भारतात 558 रँक मिळवले आहेत. त्याने सिद्ध केले की आपण मनापासून आणि उत्कटतेने काहीतरी करण्याच्या प्रयत्न केला तर आपण यशस्वी होतो. असीम खान हा समाजासाठी यशस्वी विद्यार्थ्यांचे एक उदाहरण बनला आहे. आणि जगातील प्रत्येक मुलाने त्यांना बघून हे समजून घेतले पाहिजे की कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी भाषा अडथळा बनत नाही. जर तुम्ही प्रामाणिक आणि मेहनती असाल जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीत यश मिळेल.
त्यांचे यश पाहून चोपडा शहराचे सुरमाज फाउंडेशन त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले आणि सुरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख साहब यांनी असीम खान यांचे अभिनंदन केले व मार्गदर्शन करतांना सांगितले की, आता तुम्ही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहात तुम्ही समाजासाठी एक उदाहरण बनलात या यशाचा लाभ तुमच्या समाजातील आणि भारत देशाला द्या. सुरमाज फाउंडेशनच्या सर्व मित्रांनी प्रार्थना केली की अल्लाह असीम साहेबांना उत्तम आरोग्य आणि उत्तम प्रगती देवो.यावेळी हाजी उस्मान साहाब यांच्यासोबत झियाउद्दीन काझी साहाब, डॉ. रागीब साहब, अबुलस शेख, डॉ मोहम्मद जुबेर शेख, जुबेर बेग शोएब शेख आणि सहकारी सुरमाज फाउंडेशन उपस्थित होते.