रंजाणे गावात गटारी की नाला.. अहो..भाऊसाहेब तुम्ही आधी डोळे तर खोला.. रोगराई पसरण्याचे संकेत ..सर्वत्र दूर्गंधी.. गावकऱ्यांचा पारा तप्त.. ताबडतोब लक्ष घाला..भिल्ल विकास मंचची मागणी
शिदखेडा ,दि.०३ (प्रतिनिधी- रविभाऊ शिरसाठ) तालुक्यातील रंजाणे येथील गटारी पाऊसाच्या पाण्याने तुडुंब भरल्या असून अक्षर: नाल्याचे स्वरूप आले आहे.गटारींची घाण न काढल्यास गांवभर साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता बळावली आहे ग्रामसेवक भाऊसाहेब मात्र कानावर बोटं ठेऊन असून पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे तरी वरिष्ठ पातळीवरून भाऊसाहेब यांचे कान टोचून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.
तालुक्यातील रंजाणे येथील गल्लीत गटारीचे पाणी साचल्याने नळ ही दिसेनासे झाले .. रंजाणे ग्रामपंचायत ला कळवुन १५ दिवसाचा कल ओलांडला असुन ग्रामपंचायत का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न गल्लीतील ग्रामस्थांनी केला आहे.. गल्लीत २ फुटापर्यंत पाणी साचल्याने जाण्यायेण्यासाठी सुद्धा रस्ता दिसत नाही. मागील काहि दिवसात पण मुख्य चौकात पाणी साचते व इंदासिनी माता चौकात ही रस्ता चिखलमय झालेला आहे आशा अशयाचे तोंडी ग्रामपंचायत ला कळवुन ही त्या कडेही ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केलेले आहे ..आता तर गावात मलेरिया, सर्दी,खोकला, इतर आजाराने आपले पाय पसरवायला सुरवात केलेली आहे.
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असुन याला जबाबदार कोण असणार आहे? तत्काळ दखल न घेतल्यास मोठ्या सख्खेंने जाऊन सि.ओ. व बी.डी.ओ. जवळ तक्रार करणार आहोत असे भिल्ल विकास मंच चे श्री.बापु ठाकरे, माजी सरपंच श्री.दिपक ठाकरे, निलेश भोई, नाना पाटील ,यांनी कळवले आहे