ठेकेदार साहेब रत्यावर लक्ष द्या शिंदखेडा ते शेवाडी जुना डांबरी रस्ता वरच्या वर खोदून खडी टाकण्याचा प्रकार ...।

 


ठेकेदार साहेब रत्यावर लक्ष द्या शिंदखेडा ते शेवाडी  जुना डांबरी रस्ता वरच्या वर खोदून खडी टाकण्याचा प्रकार ...।


चिमठाणे दि,01( परिसर -प्रतिनिधी प्रविण भोई.).

रस्त्याच्या कामात निकृष्ट काम हा शब्द आपल्याला काय नवीन नाही ..याचा प्रत्येक कामात कुठे ना कुठे उल्लेख होतोच...अशाच प्रकार शिंदखेडा ते शेवाडी दरम्यान राज्य महामार्ग क्र.12  रस्त्याचे काम चालू आहे त्या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी नवीन प्रकार बघायला मिळाला तो म्हणजे चिमठाणे गावाच्या पुढे अमराळे फाट्याच्या पुढे पेट्रोल पंपाजवळ ..जुना डांबरी रस्ता जे.सी.बी च्या साह्याने वरच्या वर खोदून त्या वर खडी टाकण्याचा प्रकार चालू आहे....नवीन रस्ता बनवंताना अगोदरचा डांबर किंवा खडी चा कुठल्याच प्रकारच्या थर रोडावर राहू देता येत नाही..संपूर्ण अगोदरच्या रस्त्याचे खोदकाम करून जुने मटेरियल बाहेर काडून त्याची विल्हेवाट लावावी लागते,अगोदरचा कुठलाच थर वापरण्याची परवानगी परवानगी नसते   ,डांबर,खडी ,मुरूम जे पण लागणारे  मटेरियल असो ,त्याचा  इन्स्टिमेंटच्या हिशोबाने इंच,किंवा फूट ,लांबी, रुंदी ,सर्वा गोष्टी तंतोतंत असणे बंधन कारक असते कारण.रोडाच्या टिकाऊ पनाच्या नियोजनाने या सर्व गोष्टी संबधित कॉन्ट्रॅक्टर ,इंजिनेर, व संबाधित सर्व ,रोडाची संपूर्ण जबाबदारी असते . ..मात्र अमराळे ,श्री क्षेत्र गांगेश्वर फाट्याजवळ अगोदरच्या रोडाचा वरच्या वर थर काडून  रोडाचे काम निकृष्ट दर्जाचे  करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना ? असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे... रोडाचे पूर्ण खोदकाम न झाल्यास व वरच्या वर खडी मुरूम टाकल्यास  भविष्यात रोडाची पकड कमजोर होईल व रोडात समानता राहणार नाही..कोट्यवधी रुपये  सरकार लोकांसाठी रस्ता बनविण्यावर खर्च करत आहे ....तो रास्ता पुन्हा पुन्हा  वारंवार होत नाही.एकदा झालेले काम पुन्हा पुन्हा होत नाही..त्या मुळे रस्ता जास्त वर्ष कसा चांगला राहील याची इन्स्टिमेंट मध्ये तंतोतंत माहिती असते.पण सर्व काम इन्स्टिमेंटच्या हिशोबाने होते का? हे बघणे खूप महत्वाचे असते....इन्स्टिमेंट ज्या गावाला लागून रस्ता बनत आहे..त्या गावातील सर्व लोकांना त्या बद्दल माहिती असणे आवश्यक असते..जेणे करून रस्ता त्याच हिशोबाने बनतो आहे की नाही याची जनसामान्यांना माहिती असने आवश्यक आहे...त्याचे फलक रस्त्याचे काम चालू असताना रोडावर लावले गेले पाहिजे ...रुंदी लांबी,थर इ...,या सर्व गोष्टींचे फलक रस्त्यावर लावणे जेणे करून लोकांना त्याची माहिती होईल..हे संबंधित कॉन्ट्रॅक्टर ,यांचे काम आहे..पण तसे होत नाही ,रोडाचे असो किंवा दुसरे इन्स्टिमेंट सहजा सहजी सर्व साधारण लोकांना भेटत नाही...किंवा भेटू दिले जात नाही.किंवा टाळाटाळ केली जाते.....असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही...सदरील रस्ता नवीन खोदून रस्त्याची लेव्हल प्रमाणे बनवला गेला पाहिजे...नाही तर पुढे जाऊन रस्ता खराब होऊन जैसे थे परिस्थिती निर्माण होईल,....याला जबाबदार कोण? याची दखल लवकरात लवकर घेतली जाईल का? हे बघणे सोईस्कर ठरेल...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने