*महिला बालकल्याण सभापती सौ.ज्योतिताई राकेश पाटील व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राकेश दादा पाटील यांच्या प्रयत्नाने सुटकार गांवी अंगणवाडी खोली बांधकाम मजूर.. उदघाटन सोहळा नुकताच पार.. गावकऱ्यांनी मानले जोरदार आभार..*

चोपडा दि.११(प्रतिनिधी): जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती सौ.ज्योतिताई राकेश पाटील यांच्या व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष  राकेश दादा पाटील यांच्या प्रयत्नाने सुटकार येथे अंगणवाडी खोलीचा उदघाटन समारोह नुकताच पार पडला असून ताईंच्या विकास कार्याचे गाववासियांनी  जोरदार मानले आहेत.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, जि. प .महिला बालकल्याण सभापती ज्योतिताई राकेश पाटील यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष  राकेश दादा पाटील जातीने लक्ष घालून विशेष प्रयत्न करून ऐसुटकार गावासाठी अंगणवाडी खोली बांधकाम मंजूर करून घेतली.या कामांचा उदघाटन  त्यांच्या वरदहस्ते पार पडला. याप्रसंगी सरपंच वासुदेव ठाकरे ,ग्रा .प. सदस्य विजय बाविस्कर, भूषण ठाकरे ,दिनकर ठाकरे, सागर कोळी ,मनोहर कोळी ,जयसिग पाटील, ग्रामसेवक जयवंत पाटील यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने