चांदवड शहरातील नाले साफसफाई गरजेची?..नगरपालिकेचा भोंगळ कारभार.. डासांच्या उत्पत्तीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात..
चांदवड दि.११(शहर प्रतिनिधी -संदीप पाटील): शहरातील बस स्टँड शेजारून एक नाला वाहत असून दुसरा नाला गुजराथी नगर जवळून सध्या मोठ्या प्रमाणात वाहत आहे,मात्र शहरातील नाल्यांची अशी दुरावस्था झालेली आहे हे छायाचित्रावरुन समजलेच असेल? नाल्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत. नगरपरिषदने जे सी बी लावून नाले साफसफाई करणे आवश्यक आहे.यात प्रचंड डास असून पुढील आजारास आमंत्रण मिळत आहे.सध्या शहरात डेंग्यू, चिकूनगुण्या अश्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे,याच अनुषंगाने साफसफाई वेगाने होणे गरजेचे आहे अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहे.सायंकाळी मोठ्या प्रमाणात डास चावत असल्यानं डासांच्या अगरबत्त्या लावूनच दुकानात बसावे लागते मात्र त्यामुळेही श्वासनास त्रास होतो असे मत व्यावसायिक कृष्णा गांगुर्डे यांनी व्यक्त केले.