*रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे १८ शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने होणार सन्मान...*१३ रोजी पुरस्कारांचे वितरण...*

 



*रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे १८ शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने होणार सन्मान...*१३ रोजी पुरस्कारांचे वितरण...*

   चोपडा दि.११,(शहर प्रतिनिधी) :--

          शिक्षकांचा कार्याचा राष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा आहे. शिक्षकांच्या या कार्याची दखल घेऊन  रोटरी क्लब ऑफ चोपडाकडून तालुक्यांतील विविध शाळेतील १८  शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे . सोबत इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन दि. १३ रोजी करण्यात आल्याचे  चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांनी सांगितले आहे.

        सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ एल ए पाटील (माजी प्राचार्य - प्रताप महाविद्यालय अमळनेर व नॅनो टेक्नॉलॉजी तज्ज्ञ ) हे असणार आहेत . तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरूणभाई गुजराथी ( माजी विधानसभा अध्यक्ष म. रा.) असणार आहेत.

        रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे दरवर्षी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधत , तालुक्यांतील विविध शाळेतील गुणवंत शिक्षकांची निवड करून , त्यांच्या कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या उपस्थितीत नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित केले जाते. तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीत शाळेतून प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास डॉ एल ए पाटील ( माजी प्राचार्य - प्रताप महाविद्यालय अमळनेर व नॅनो टेक्नॉलॉजी तज्ज्ञ ) हे मार्गदर्शन करणार आहेत.

        सदर कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख रोटे विलास पी पाटील आणि रोटे. गौरव महाले आहेत. चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले व मानद सचिव रोटे प्रविण मिस्त्री आदी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने