*झटपट पोलखोल न्यूज चॅनल वृत्ताची दखल.. शिरपूर न.पा.प्रशानाकडून नाला सफाई जोरात.. नगर निर्वासितांनी व्यक्त केले समाधान*

 




*झटपट पोलखोल न्यूज चॅनल वृत्ताची दखल.. शिरपूर न.पा.प्रशानाकडून नाला सफाई जोरात.. नगर निर्वासितांनी व्यक्त केले समाधान* 


शिरपूर दि.११ (तालुका प्रतिनिधी, हिराभाऊ कोळी)*:  शिरपूर शहरात  अस्वच्छतेचा कळसं गाठल्याबाबत नगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे घाणीचे साम्राज्य वाढल्या प्रकरणी झटपट पोलखोल न्यूज चॅनलने वाचा फोडली असता.. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांना जाग येऊन  शहरात साफ सफाई मोहीम राबवून नाला सफाईचे  काम जोरात झाल्याने रहिवाशांनी झटपट पोलखोल टीमवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

शहरातील काही भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने शहरवासियांनामध्ये प्रचंड घबराहट पसरली होती त्यात वाल्मिकनगर,किस्मत नगर,हुडको परिसराचा समावेश होता डेंग्यूचे थैमान वेळीच न रोखल्यास नागरिकांचे प्रचंड रोषाचे उग्र रूप धारण होऊन परिस्थिती बिघडल्यास न.पा.प्रशासन जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा रहिवाशांनी दिला होता.

वाल्मीकी नगर परिसरातील रहिवासी सौ.अनिता कोळी नामक महिलेस  डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.  या परिसरातील नागरिकांच्या स्वच्छतेची मागणीकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती मात्र प्रशासनाने पूर्णपणे  दुर्लक्ष केले होते . याबाबत झटपट पोलखोल न्यूज चॅनलने आवाज उठवत नपा प्रशासनाला वेगळीच जागे करण्याचे मौलिक काम केल्याने प्रशासनाने ताबडतोब नाला व साफ सफाई मोहीम राबविल्याने परिसरातील रहिवास्यांनी  नगरपालिका प्रशासनाचे व झटपट पोलखोल न्यूज चॅनलच्या टीमचे आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने