*रंजाणे येथील आदिवासी बांधवांना खावटी किट वाटप .. नगरसेवक दीपक अहिरे यांच्या वरदहस्ते*






 *रंजाणे येथील आदिवासी बांधवांना  खावटी किट वाटप .. नगरसेवक दीपक अहिरे यांच्या वरदहस्ते* 

शिंदखेडा दि.१०:-( प्रतिनिधी रवि शिरसाठ ):

तालुक्यातील रंजाणे येथील आदिवासी बांधवांना खावटी  कीट वाटपांचा कार्यक्रम आज शिंदखेडा येथील आदिवासी मुलांचे वस्तीगृहात   नगरसेवक व भिल समाज विकास मंचचे स्वस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या हस्ते कीट चे वाटप करून कार्यक्रम  पार पडला..  

कोविड १९ प्रादुर्भावामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसमोर उध्दभवलेल्या बेरोजगारीचा प्रश्न विचारात घेऊन राज्यातील दुर्गम भागातील राहाणाऱ्या आदिवासी कुटुंबाना अनुदान स्वरूपात लाभ देण्याचा उद्देशाने खावटी अनुदान योजना राज्यात राबवण्यात मान्यता दिली गेली,  सदर खावटी  अनुदान हे आदिवासी विकास महामंडळ महा.राज्य सरकारने अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना प्रती कीट व्यक्ती, मिठ, तेल, हरभरा,  मठ, साखर, मठदाळ,  गरम मसाला,  चवळी,  वटाणा, उळीद दाळ,  मिरची पावडर, चहापत्ती, तुरदाळ शिवाय दोन हजार रूपये प्रतेक लाभार्थींच्या खात्यात रोख रक्कम स्वरूपात जमा करण्यात आलेली आहे..

प्रसंगी नगरसेवक व भिल समाज विकास मंच चे स्वस्थापक अध्यक्ष   दिपक अहिरे,  ग्रहपाल के.के.अवय्या, अधिक्षक एच.एफ.भादले, शिक्षक भिमराव पावरा, भिल समाज विकास मंच चे बापु ठाकरे, रंजाणे चे माजी सरपंच दिपक ठाकरे , आ.को.स.स.समिती चे खांदेश उपाध्यक्ष रविभाऊ शिरसाठ,  ग्रा.प.सदस्य अशोक ठाकरे, छोटु सावळे सुकदेव ठाकरे,  रविंद्र सावळे,  महारू भाया ठाकरे, हिसपुकर मामा, चिंतामण भगत, अशोक ईशी, हिरालाल ठाकरे, उखा महाराज ठाकरे, श्यामराव आण्णा ठाकरे, रविंद्र मोरे, सायबु भगत,  जगन ठाकरे, छोटु ईशी, हिरामण ठाकरे, विजय बापु शिरसाठ,  भाऊराव सोनवणे राजु पारधी, बापु पारधी, आदि आदिवासी बांधव उपस्थित होते

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने