आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना अखिल भारतीय युवा कोळी/कोरी समाजाचे मागणीचे निवेदन

 

 


आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना अखिल भारतीय युवा कोळी/कोरी समाजाचे मागणीचे निवेदन

चोपडा दि.१८( प्रतिनिधी ):येथे रेस्ट हाऊस नंदुरबार चौफुली येथील, महाराष्ट्र राज्याचे पदवीधर मतदार    संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना ,अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचा तर्फे धुळे जिल्हा अध्यक्ष ,संतोष कोळी पत्रकार, वसंत कोळी अतुल कोळी विशाल कोळी मनोज महाजन पुष्पक पाटील यांच्या उपस्थितीत आदिवासी टोकरे कोळी, समाजाचे समाजाविषयी ,माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शालेय  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही व 100/टक्के मिळाली, पाहिजे, तसेच जातीचे प्रमाणपत्र मागणी करताना दोन पेक्षा जास्त पुरावे मागू नये असे मागणीचे निवेदन डॉक्टर आमदार सुधीर तांबे साहेब यांनी मंत्रालयात मांडण्यात यावे अशा आशयाचे निवेदन पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे,डा बापूसाहेब रवींद्र देशमुख , यांना अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज धुळे जिल्हा अध्यक्ष, तथा , केंद्रीय मानवाधिकार नई दिल्ली संघटन उत्तर महाराष्ट्राचे महासचिव, संतोष कोळी पत्रकार, विनोद कोळी वसंत कोळी छोटू सैंदाणे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने