अमळनेर येथे महंत प्रा.हभप सुशिल महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वृक्षारोपण तथा भव्य मोफत आरोग्य व त्वचारोग शिबिराचे आयोजन झाले*

 




*अमळनेर येथे महंत प्रा.हभप सुशिल महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वृक्षारोपण तथा भव्य मोफत आरोग्य व त्वचारोग शिबिराचे आयोजन झाले*

अमळनेर दि.१८( प्रतिनिधी)

 महंत प्रा.हभप सुशिल महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त छत्रपती चौक अमळनेर यांच्या वतीने वृक्षारोपण तथा भव्य मोफत आरोग्य शिबिराचे दिनांक १७ सप्टेंबर शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ८ वाजता श्री संत तानाजी महाराज मठ,पैलाड येथे हभप  गुलाब म लोणकर,हभप भानुदास म चंदिले व मा.सचिन भाऊ खंडारे (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

तसेच सकाळी ९.३० वाजता नवयुग हॉस्पिटल,छत्रपती चौक,मंगलमुर्ती नगर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा.आ.अनिल भाईदास पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून हिंगोने गावाच्या सरपंच मा.ताईसो राजश्री ताई पाटील,भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष मा.ताईसो.स्मिताताई वाघ,नाशिक येथील से.नि. पोलीस उपायुक्त मा.मंगलसिंग सूर्यवंशी साहेब,निमा संघटनेचे अध्यक्ष मा.डॉ.रवींद्र जैन,जळगाव दुध संघ संचालक व भा.ज.पा.यु.मो प्रदेश सचिव ताईसो. भैरवीताई वाघ- पलांडे,प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.भूषण पाटील,हभप गुलाब म लोणकर,सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन भाऊ खंडारे,डॉ.राहुल पाटील,डॉ.विनोद पाटील, डॉ.प्रमोद पाटील,डॉ.अक्षय कुलकर्णी,डॉ.प्रमोद कोळी,सौरभ लोटन पाटील आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रा.सुशिल महाराज यांचा छत्रपती चौक मित्र मंडळातर्फे सामूहिक सन्मान करण्यात आला.

शिबीराचे उदघाटन प्रसंगी बोलतांना मा.राजश्री ताई यांनी सांगितले की कोरोनानंतर लोकांना आरोग्याचे महत्व कळाले,व हा स्तुत्य उपक्रम आयोजकांनी राबवला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानले,त्यांनतर मा.मंगलसिंग सूर्यवंशी साहेब यांनी प्रा.सुशिल महाराज यांची लोकांना ओळख करून देत महाराजांनी अध्यात्मिक साधनेसोबत वैज्ञानिक गोष्टींची सांगड घातली व असे सांगितले तद्नंतर मा.डॉ.रवींद्र जैन सर यांनी भविष्यात अश्या कार्यक्रम ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले,तद्नंतर प्रा.सुशिल महाराज यांनी सर्व छत्रपती चौक मित्र मंडळाचे आभार मानले,सुत्रसंचलन सुप्रीम माऊली यांनी केले.

शिबिरामध्ये डॉ.राहुल पाटील (MBBS,DNB,Medicine,Mumbai),डॉ.विनोद पाटील(MBBS, DNB,Medicine),डॉ.अक्षय कुलकर्णी(M.D,Drematology,Pune),डॉ.प्रमोद पाटील(Drematologist,Dhule) यांच्या तर्फे मार्फत आरोग्य व त्वचारोग तपासणी करण्यात आली. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्वचारोग साठी 200 आणि आरोग्य तपासणी साठी 160 असे एकूण 360 व्यक्तीची आरोग्य तपासणी केली.

आरोग्य शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी दिनेश पाटील सर,लोटन पाटील,विनोद पाटील,ईश्वरभाऊ देशमुख,राजुभाऊ गुर्जर,अमोल मुसळे,सचिन अहिरे,विजय पाटील,माधवराव पाटील,राहुल कोळी,आंबादास चव्हाण,सुरज गौतम, पाटील,नितीन धनगर,महेश चौधरी, शिव,लकी,तन्मय तसेच छत्रपती चौक मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने