*दोंडाईचा युवासेना व श्रीरामराज्य गृपतर्फे गणेश मंडळांना वृक्ष वाटप*
*दोंडाईचा दि.१८ (प्रतिनिधी)* : वसुंधरेचे संरक्षण, पर्यावरणाचे रक्षण या संकल्पनेतून आगामी 23 सप्टेंबर रोजी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या येणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, युवासेना सहसचिव पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाने व युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांच्या संकल्पनेतून दोंडाईचा शहरातील गणेश मंडळांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.
यात मानाचा दादा गणपती, बाबा गणपती, वीर भगतसिंग, शिवराजे गणेश मित्र मंडळ, धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, भगवा चौक गणेश मंडळ, महादेव पुरा, वास्तव चौक मित्रमंडळ, बापजी ग्रृप, जैन ड्युडस गणेश मंडळ, वंजारी समाज गणेश मंडळ, संघर्ष गणेश मंडळ, छत्रपती शंभु महाराज गणेश मित्रमंडळ यांचा समावेश आहे. या मंडळांना वड, निंब, बदाम, जांभुळ, गुलमोहर, नारळ वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, युवासेना शहरप्रमुख सागर पवार, उपशहरप्रमुख आबा चित्ते, युवासेना उपशहरप्रमुख योगेश बोरसे, सुरेश कोळी, भुषण चौधरी, निलेश सदाराव, भारत कोळी, विठोबा ठाकुर, बबलू सोलंकी, आकाश ठाकूर, सनी कोळी, पंकज कोळी, गोलू ठाकूर, सोनू कोळी, नानु ठाकूर, चेतन चौधरी यासह युवासैनिक उपस्थित होते.