अकोला बाजार पोलिसांचा रूट मार्च
अकोला बाजार दि.१८(प्रतिनिधी):
यावर्षी कोरोना असल्यामुळे यंदा बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मनाला भाळून टाकतात आणि विसर्जन जवळ आल्यामुळे त्या अनुषंगाने वडगाव पोलिस स्टेशन जंगल हद्दीत असलेल्या गाव अकोला बाजार येथे ठाणेदार श्री पवन राठोड यांनी आपल्या पूर्ण सहकारी मिळून रूट मार्च चे आयोजन केले होते. हे रूट मार्च सकाळी 11.30 ते 12.10 पर्यंत काढण्यात आली. यावेळी ठाणेदार श्री पवन राठोड उपनिरीक्षक श्री गिरीश तोगडवार व 12 अंमलदार तसेच 8 होमगार्ड या सर्वानी मिळून रूट मार्च गावातून काढला. यावेळी उपस्थित म्हणुन गावातील नागरिक होते