प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत पष्टाणे ते उखळवाडी रस्ता काम निकृष्ट दर्जाचे..मनसेचा आंदोलनाचा इशारा*

 





*प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत पष्टाणे ते उखळवाडी रस्ता काम निकृष्ट दर्जाचे..मनसेचा आंदोलनाचा इशारा*
जळगाव ,दि.२०(प्रतिनिधी)
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत पष्टाणे ते उखळवाडी ता.धरणगांव जि.जळगांव या रस्त्याचे  सुरु असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यात लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास १० दिवसात काम बंद पाडण्यात
असा इशारा मनसेचे जळगांव जिल्हा संघटक
राजेंद्र एस.निकम  यांनी एका पत्रकान्वये मुख्याधिकारी जळगाव यांना दिला आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने
अंतर्गत पष्टाणे ते उखळवाडी ता.धरणगांव या रस्त्याचे काम सुरु केलेले आहे. परंतु 
धरणगांव येथे स्थानिक कार्यकर्त्यांनी व मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष स्पॉट वरती जाऊन त्याची पाहणी केली  अनेक ठिकाणी  काम करणेसाठी जे मटेरीअल
वापरत आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरत आहे. त्यातच अनेक ठिकाणी कच चा वापर केलेला आहे,
व्यवस्थित पी.सी.सी.,सोलींग करण्यात आलेले नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे    काही ५ ते ६ मोऱ्या
करण्यात आलेल्या असतील त्या सर्व काढण्यात याव्यात. त्याठिकाणी  इंजिनिअर नेमून 
उभे राहून सदरील काम करुन घेण्यात यावे. कोणत्याही प्रकारचा
भ्रष्टाचार होता कामा नये

याची दखल घेण्यात यावी.
सदरील काम हे १० दिवसाचे आत न केले गेल्यास  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते प्रत्यक्ष
जागेवर जाऊन सदरील काम बंद पाडण्यात येईल असा इशारा मनसेचे कार्यकर्त्यांमार्फ  देण्यात आला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने