*सप्तरंग मराठी चॅनल आयोजित "जळगांव गौरव पुरस्कार" कार्यक्रम.. खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
रावेर दि.१२(प्रतिनिधी)
कोविड काळात तसेच शेती, बांधकाम, पत्रकारिता, शिक्षण, पोलीस ई. वेगवेगळ्या क्षेत्रात जळगांव जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सप्तरंग मराठी चॅनलद्वारे हॉटेल प्रेसिडेंट येथे *"जळगांव गौरव पुरस्कार"* कार्यक्रम आयोजित करून गौरव करण्यात आला, सदर कार्यक्रमास *खासदार रक्षाताई खडसे* प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या, यावेळी पुरस्कार वितरण करतांना सप्तरंग मराठी चॅनलच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवानी, श्याम वाणी, मराठी मालिका अभिनेता शशांक केतकर यांच्यासह सप्तरंग मराठी चॅनलची संपूर्ण टिम उपस्थित होती.