यावल येथे जिल्हा आरोग्य अधिकारी याची भेट

 



यावल येथे जिल्हा आरोग्य अधिकारी याची भेट

मनवेल ता.यावल दि.१२(वार्ताहर ) यावल येथे २३ वर्षीय तरुणाच्या डेग्यु सृदृश्य  या आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यावल शहरात मृत्यू कुटूंबाच्या घरी भेट देऊन सात्वन केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ जमादार , जिल्हा हिवताप अधिकारी डाँ देवराम लांडे व डाँ समाधान वाघ यांनी यावल शहरातील गणपती नगर भागात पाहणी केली व आवश्यक त्या  सूचना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरडा दिन पाडणे गप्पी मासे पाडणे व परीसरातील नागरिक यांचे रक्त नमुने घेऊन जिल्हा शाषकीय रुग्णालयात तपासणीसाठी करीता पाठविण्यात आले असुन दहा दिवस शहरातील कठोर सर्वक्षण करण्याचा सुचना देण्यात आल्या.

यावेळी ३३० घरातील पाणी नमुने तपासणी करण्यात आले त्या ६७ घरातील भांडे दुषित आढळून आले.याकामी आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे, आरोग्य सेवक आर. एस. तडवी, आरोग्य सेवक एस. डी. आहिरराव, गीरीष जावळे, सतीष पवार ,अनिकेत बोरसे यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने