*शिंदखेडा येथे रन र्स गृप व खान्देश रक्षक संस्थेच्या वतीने सैन्य भरती पुर्व मैदानी स्पर्धा चाचणी कार्यक्रम* ... आजी-माजी सैनिकांचा सन्मान व बक्षीस वितरण
शिंदखेडा दि.१३( प्रतिनिधी यादवराव) येथील मराठा समाज कार्यालयात आयोजित रनर्स गृप व खान्देश रक्षक संस्था शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका सैन्य भरती पुर्व मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व आजी माजी सैनिकांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला .सदर कार्यक्रमासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष दादा मराठे यांचे विशेष योगदान लाभले. सुरुवातीला एस.एस.व्ही.एस.महाविदयालयाच्या प्रांगणात झालेल्या मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेचे उदघाटन भाजपा रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष दादा मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.हयात गोळाफेक ,लांबउडी ,उंचउडी , 100 मीटर धावणे .1600 मीटर धावणे या सैन्य भरती पुर्व चाचणीसाठी आवश्यक स्पर्धा घेण्यात आल्या. तालुक्यातील सुमारे शंभर स्पर्धकांनी सहभाग घेतला.प्रत्येक प्रकारात तीन प्रोत्साहन क्रंमाक निवड करण्यात आली. हयासाठी रनर्स गृप व खान्देश रक्षक संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. त्यानंतर बक्षीस वितरण व आजी माजी सैनिक गौरव सोहळा पार पडला.हया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत भाजपा गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे होते.प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सभापती प्रा.सुरेश देसले ,विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक सुनील चौधरी .रेल्वे प्रवासी संघटना तालुकाध्यक्ष दादा मराठे , सिनेट सदस्य अमोल मराठे , पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.दिपक माळी , कार्याध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य प्रदिप दिक्षीत ,खान्देश रक्षक संस्थेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे ,लक्ष्मीकांत सोनवणे ,गणेश मराठे ,रनर्स गृप प्रमुख भुषण पवार ,वृक्षसंवर्धन समिती अध्यक्ष योगेश चौधरी ,राजेंद्र मराठे , राहुल पाटील ,मयुरेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळा पुजन व दिपप्रजलन करण्यात आले.प्रास्ताविक भुषण पवार यांनी केले. *प्रास्ताविकातुन भुषण पवार यांनी सांगितले की.आमचा एकच उद्देश आहे की तालुक्यात तरुणांना सैन्य भरतीत कोणतीही उणीव भासु नये म्हणून भरती अशा मैदानावरील चाचण्या घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे होय. हयापुढेही शिबीर आयोजित करणे आमचा मानस आहे.सैनिकांचा गौरव आमच्या साठी अभिमानाची बाब आहे.हयापुढेही देशसेवा , समाजसेवा सुरू राहील.* त्यानंतर मैदानी स्पर्धेत *गोळाफेक* प्रथम -अमोल पवार , द्वितीय - मयुर सोनवणे ,तृतीय- सागर लोंढे *लांबउडी* प्रथम - पवन राजपूत द्वितीय - राम भिल ,तृतीय - समाधान कोळी *उंचऊडी* प्रथम - शुभम मराठे द्वितीय - विशाल पाटील ,तृतीय - तिर्थराज पाटील *100 मीटर धावणे* - प्रथम - राम भिल द्वितीय -समाधान कोळी तृतीय -नरेश गिरासे *1600 मीटर धावणे* प्रथम -किशोर भिल ,द्वितीय -प्रविण गिरासे तृतीय -प्रशांत राजपूत तर आजी माजी सैनिक गौरवात भुषण पवार ,ज्ञानेश्वर गिरासे ,नितीन मिस्तरी ,प्रमोद बोरसे ,नंदलाल साळुंखे , भाऊसिंग गिरासे ,सचिन पाटील ,जितेंद्र गिरासे ,संजीव नगराळे ,सोनु देसले , विजय चव्हाण ,प्रमोद देसले ,प्रमोद गुरव ,प्रविण बडगुजर ,देविदास पाटील ,जगदीश बडगुजर ,शांताराम जाधव , दिलीप पाटोळे .देविदास कोळी , चेतन भिल ,चंद्रकांत पाटील ,नथ्थु सुर्यवंशी ,योगेश कोळी , नरेश कोळी चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश होता.तसेच विशेष योगदान म्हणून वृक्षसंवर्धन समिती अध्यक्ष योगेश चौधरी ,राजेंद्र मराठे ,भुषण पवार ,जिवन देशमुख ,राहुल कौठडकर तर राष्ट्रीय पातळीवर अमोल पवार , खुशाल चौधरी यांना गौरविण्यात आले.हयावेळी प्राचार्य प्रदीप दिक्षीत यांनी मनोगतातून शहरात क्रिडा संकुलन उभारणी साठी नगरपंचायत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकत्र यावे .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रनर्स गृप व खान्देश रक्षक संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन व आभार योगेश चौधरी यांनी केले.