वर्डी येथे खावटी किटचे वाटप.
अडावद ता. चोपडादि.१० (प्रतिनिधी) :-
चोपडा तालुका वर्डी येथे गाव परिसरातील आठ सप्टेंबर रोजी ,आदिवासी विकास प्रकल्प यावल विभाग तर्फे मराठी शाळा वर्डी येथे भिल , कोळी, पावरा, पारधी, तडवी, यातील आदिवासी कुटुंबीयांना प्रत्येक कुटुंबाला दोन हजार रुपये राष्ट्रीय कृत बँकेत खात्यावर जमा करून, तसेच अन्नधान्याची साखर, तेल, हरभरा, चवळी , मटकी, वटाणा, तूर डाळ , उडीद डाळ, मटन मसाला, मीट ,चहा पावडर, मिरची पावडर, तसेच इतर साहित्य समाविष्ट असलेली 115 कुटुंबांना धान्याचे कीट देण्यात आले.
धान्याचे कीट वाटप प्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प तर्फे अविनाश पवार ,अक्षय सोनवणे ,ईश्वर बारेला, सुखदेव बाविस्कर यांच्या मार्फत देण्यात आले ,तसेच किट वाटप प्रसंगी वर्डी ग्रामपंचायत सरपंच बबीता धनगर ,उपसरपंच उषाबाई कोळी, पोलीस पाटील पद्माकर नाथ ,सदस्य पि .के नायदे, रामराव बारेला महारु सुलताने ,गुलाब ठाकरे ,कवीश्वर पाटील ,रगन बारेला, मोहन चव्हाण यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.