पंचायत राज समितीची रावेरला तपासणी.. विविध समस्यांसोबत जोरदार स्वागत
रावेर दि.२९(प्रतिनिधी):
*काल दि. २८ रोजी, पंचायत राज समिती च्या रावेर तालुका दौऱ्या निमित्त रावेर पंचायत समितीला या कमेटीचे गटप्रमुख आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर), आमदार माधवराव जवळगावकर (नांदेड) व आमदार डॉ. देवराम होळी (गडचिरोली) तसेच समितीसोबत विधान मंडळ अधिकारी शशिकांत साखरकर (मुंबई), जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, प्रतिवेदक मैत्रीय कुलकर्णी उपस्थित होते.*
याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य रमेशदादा पाटील, रा.कॉ. रावेर तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, रा.यु.कॉ. जळगांव जिल्हाकार्याध्यक्ष तथा रावेर प.स. सदस्य दिपक पाटील, रा.यु.कॉ. जिल्हाउपाध्यक्ष तथा रावेर प.स. सदस्य योगेश पाटील, रा.यु.कॉ. रावेर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रा.यु.कॉ. रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन, युवक जिल्हाउपाध्यक्ष कुणाल महाले, रा.यु.कॉ. रावेर तालुका उपाध्यक्ष तथा अटवाडा लोकनियुक्त सरपंच गणेश महाजन, राजेंद्र महाजन, पवन महाजन, वैभव तायडे आदी उपस्थित होते.