*शारदा विद्या मंदिर, साकळी, यांची नवोदय निवड चाचणी परीक्षेत यशाची परंपरा कायम!*
मनवेल ता,यावल (वार्ताहर )
शैक्षणिक वर्ष सन- 2021-22 मध्ये केंद्रीय नवोदय विद्यालय साकेगाव, ता.भुसावळ, जि. जळगांव मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी यांची यशाची परंपरा कायम ठेवून सदर निवड चाचणी परीक्षेत
**तिर्थराज कैलास महाजन*
*दिव्यांशु रामकृष्ण महाजन**
या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री. एम ए महाजन, श्री. एन पी पाटील,श्री. सदाशिव पी. निळे, श्रीमती के एम देसले, यांनी केले. तर कार्यालयातीन कामाजात विशेष सहकार्य श्री. एस पी निळे भाऊसाहेब यांनी केले.विशेष बाब म्हणजे नवोदय निवड चाचणी परीक्षेत या विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता यादीत असतात ही ग्रामीण भागातील एक उल्लेखनीय आणि अभिमानास्पद बाब असून यासाठी संस्थाध्यक्ष दादासाहेब श्री. वसंतराव रामजी महाजन यांचे या चढत्या आलेखासाठी विशेष मार्गदर्शन असते
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री. वसंतराव रामजी महाजन,उपाध्यक्ष तात्यासाहेब श्री. वसंतराव दयाराम पाटील, कार्याध्यक्ष नानासाहेब श्री.सुभाष भास्करराव महाजन, प्रथम महिला सरपंच व मा जि प सदस्या, ताईसाहेब सौ. विद्याताई वसंतराव महाजन, विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी पी बोरसे,पर्यवेक्षक श्री.एस जे पवार सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले व पुढीलवाचालीसाठी शुभेच्छा दिल्या. .