वडती ग्रामपंचायतने डेंग्यू सदृश्य आजारांवर नियत्रंणासाठी धुरफवारणीला केली सुरूवात .



 



वडती ग्रामपंचायतने डेंग्यू सदृश्य आजारांवर नियत्रंणासाठी धुर फवारणीला केली सुरूवात . 

चोपडा दि.२९( प्रतिनिधी )तालुक्यातील वडती येथील ग्रामपंचायतने सध्या पावसाच्या वातावरणा भेडसावणा-या डेंग्यू सदृश्य आजारांवर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने (फॉगमशीनने ) धुरफवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसाने  नागरीक हैरान होवून जातात अन् याला प्रमुख कारण म्हणजे डास ,मच्छर व अन्य घातक सुक्ष्मजीव कारणीभुत ठरतात.

 यांची झपाटय़ाने होणारी वाढ थांबवणे व त्यांचा बंदोबस्त करणे महत्वाचे असते. यादृष्टीने गावात डास, मच्छर या पासून होणा-या आजारांवर नियंत्रीण व बंदोबस्त ठेवण्यासाठी येथील वडती गृप ग्रामपंचायतीने स्वमालकीचे 'धुरयंत्र' घेत आरोग्याच्या बाबतीत जनहितार्थ निर्णय घेतल्याने एक पाऊल पुढे टाकले असे म्हणता येईल. 


      सांयकाळी गावात (फॉगमशीन) धुरफवारणी  करण्यात आली  यावेळी वडती ग्रा.पं. च्या सरपंच- सौ. मनिषा भिल्ल , ग्रा. पं. सदस्य- रवीन्द्र धनगर , ग्रामसेवक - नरेन्द्र शिरसाठ, ग्रा.पं.स्वं.रो.किशोर पाटील, ग्रा. पं. शिपाई राजू धनगर, यशवंत पाटील, भैय्या कोळी, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत फवारणीला सुरूवात केली. 

         

            डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून व जबाबदारीने  धुर ,औषध फवारणी केली जाणार आहे. होणारी  फवारणी ही बाहेरच्या परिसरात होते. घराभोवतीची झाडी, नाली व अन्य कचऱ्याच्या ठिकाणी ही फवारणी होणे आवश्यक आहे. तसेच  घरातील कानाकोप-यातील अडगळीच्या ठिकाणी, फ्रीज-फुलदाणी वा अन्य ठिकाणच्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने ती रोखण्यासाठी घराघरातून धूर फवारणी गरजेचे असल्याचे होवून जाते. म्हणून त्यामुळे या दृष्टीने आधी त्याबद्द्ल माहीती देणे गरजेचे आहे. 


   डेंग्यूच्या बाबतीत जनजागृती  पण तेवढेच गरजेचे आहे. ते जाणून घेणे हे देखील सुरक्षासाठी प्रत्येक नागरीकांचे काम आहे.  

डेंग्यूच्या लक्षणांमध्ये रुग्णाला ताप येणे, अंगावर लाल पुरळ उमटणे, डोळ्यामागील भाग दुखणे, तसेच सांधे व शरीरदुखी यांचा समावेश असतो.  तसेच या सोबत मलेरीयामुळे तंडी, ताप, या सारखे आजार सध्या पहावयास मिळत आहे. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून येथील ग्रामपंचायतीने धुर फवारणी करीता स्वत: मालकीचे धुर यंत्र ( फॉग मशीन )  मागविण्यात आले आहे. जेणे करून वेळेवर सदृश आजारावर आरोग्याच्या दृष्टीने नियत्रंण ठेवण्यात तेवढीच मदत होईल. फवारणी दर दोन ते तीन दिवसांनी होणे नितांत गरजेचे आहे. नाही तर जी परिस्थिति आहे तीच राहील. एक दिवसाने कोणतेही डास, मच्छर मरणार नाही त्यासाठी एका पाठोपाठ धुरफवारणी होणे गरजेचे आहे. 

        धुरफवारणी करणे हे नागरीकांचे आरोग्या बाबतीत काम नव्हे तर जबाबदारी आहे . याची बाबतीत मनाची तयारी किंवा काळजी घेणे हे देखील ग्रा.पं.चे प्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नागरीकांनी  आपली काळजी व सहकार्य करणे देखील तेवढेच अपेक्षीत अाहे.  घेतलेले धुरयंत्र फक्त शोफीस म्हणून  राहणार नाही एवढीच अपेक्षा नागरीकांची राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने