*भ्रष्टाचाराच्या कर्दनकाळ जनसेवेच्या हितोपकारी महाविकास आघाडीच्या सेनेच्या धडाकेबाज उमेदवार* *रणरागिनी सौ.अनिताई गिरासे यांना मतदारांची नंबर एकची पसंती..*
शिंदखेडा दि.२९(प्रतिनिधी)टाकरखेडाची सून आणि मंदाणे गावाची लेक अनिता नरेंद्र गिरासे म्हणजे सर्वगुणसंपन्न, धडाकेबाज नेतृत्व, कर्तुत्व, धार्मिक, सामाजिक जान असणारे व्यक्तीमत्व होय. अन्याय, अत्याचाराची चिड, बेकायदेशीर कामाना विरोध, रेती माफीयांची कर्दनकाळ म्हंटले तर वावगे ठरणार नाही. धार्मिक, सामाजिक काम करताना राजकारणा पासून चार हात दूर राहणारी अनिता गिरासे अनेक खोट्या तक्रारी व गुन्ह्याचा बळी ठरल्या.परंतु आपल्या कामात त्या किंचीत ही मागे सरकल्या नाहीत. आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जात जुल्मी अत्याचार व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचे काम त्या करीत राहील्या. जनतेच्या समस्या ची जाण असणारी, कामासाठी मेहनतीने मंत्रालयापर्यंत धडक मारणारी रणरागिनी अनिता नरेंद्र गिरासे यानी दाऊळ गणातून पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी उमेदवारी महाविकास आघाडी तर्फे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी केली आहे. अनिता गिरासे ह्या बालपणा पासूनच एक वादंग व्यक्तीमत्व विरशिरोमणी महाराणाप्रताप, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विर एकलव्य, महर्षी वाल्मिकी, रामायण,महाभारत या विचारांनी प्रेरित होऊन अन्याय, अत्याचार ची चिड निर्माण होवून स्वताला धार्मिक आणि सामाजिक कार्यात झोकून दिले.माहिती अधिकाराचा जनहितार्थ उपयोग करून भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचे काम त्या करीत राहील्या, तापीमायच्या रक्षणासाठी त्यांचे आंदोलन, शासकीय, न्यायालयीन लढा तर लक्षणीय व प्रेरणादायी आहे. काम करण्याची हिम्मत आणि यथोचित माहिती या जोरावर त्या दाऊळ गणाचा चेहरामोहरा बदलवून टाकतील यात तिळमात्र शंका नाही. अशा रणरागिनी अनिता गिरासे यांची राजकीय कारकिर्द यशस्वी जावून विजयी होवो ह्या शुभेच्छा