*चोपडा येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिर*
*चोपडा दि.२९(प्रतिनिधी)- *दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर *श्रीराम नगर चोपडा येथे सकाळी दहा ते तीन या वेळेत *मोफत आरोग्य शिबीर* होणार आहे. या शिबिरात ह्रुदया संबंधीची तपासणी टू डी इको मोफत होणार आहे. तसेच डोळे कान नाक घसा इत्यादी जनरल चेक अप मोफत होऊन आवश्यकता असल्यास मोफत ऑपरेशन होणार आहे. यासंबंधी , नागरिक बंधू भगिनींनी जागरूक राहून जास्तीत जास्त गरजू लोकांना सांगून शिबिराचा लाभ घेण्याची विनंती डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ,प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा, श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, संताजी ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.