आर.एस.निकम फाऊंडेशन तर्फे मोफत शासकीय ई-श्रम कार्ड नोंदणी.. शिबीराचे आयोजन प्रत्येक गावात
जळगावदि.२८ ( प्रतिनिधी)आर.एस.निकम फाऊंडेशन रजि.संस्था असून त्याचा नोंदणी क्र.महा./२१७९१/जळगांव असा आहे.आम्ही आमच्या संस्थेमार्फत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करित असतो. त्याच माध्यमातून सद्यस्थितीत आम्ही आपल्या जळगांव शहरात व संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये मोफत शासकीय ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्याचा
मानस आहे. त्या नोंदणी मध्ये केंद्रसरकारच्या वतीने असंघटीत कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देतांना अडचणी दूर करण्यासाठी कामगारांचे नोंदणी करण्यात येणार असून ही नोंदणी झाल्यावर पात्र नोंदणीधारकाला २ लाखाचा अपघात विमा लागू होणार आहे. तरी त्यासाठी आम्ही आमचे
फाऊंडेशनमार्फत दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पासून जिल्ह्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी सुरु करणार आहे. तरी याची नोंदणी सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील गावापासून होणार आहे.तसेच सदरील नोंदणी ही आम्ही निशुल्क करणार असून ज्या असंघटीत कामगारास ई-श्रम कार्ड
हवे असेल त्यांचेकडूनच वाजवी फी आकारली जाईल. तसेच यामागील आमचा हेतू म्हणजे बेरोजगार युवकांना एक प्रकारे रोजगार सुध्दा उपलब्ध होत जाईल. तरी याबाबतची 28/09/2021 रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिलेले आहे म्हणून आपणास माहिती व्हावी व आम्हांस सहकार्य व्हावे यासाठी सदरील पत्र आपणांस देत आहोत.
तरी सहकार्याबद्दल धन्यवाद....!
आपला नम्र