*मानवतेचा संदेश देणाऱ्या ताजुद्दीन बाबांना चोपड्यात श्रद्धांजली*
*चोपडा*दि.२७( प्रतिनिधी):- 27 सप्टेंबर 2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील जामोद येथे कीर्तन करीत असताना सुप्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. ताजुद्दिन बाबा शेख यांचे महानिर्वाण झाले. कीर्तन करत असताना, नामस्मरण करत असताना त्यांचा देहत्याग झाला. ताजुद्दिन बाबानी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदाय जोपासला .कीर्तनाच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला आणि माणुसकी हा खरा धर्म आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवले. अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली के. डी. चौधरी यानी श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर येथे ताजुद्दीन बाबांना अर्पण करण्यात आली. यावेळी हरिपाठाचा साठी जमलेल्या सर्व संताजी जगनाडे महाराज भक्तगणांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ह-भ-प गोपीचंद महाराज, ह भ प प्रकाश महाराज, ह भ प ज्ञानेश्वर महाराज, ह-भ-प विठोबा महाराज ,श्री मदन मिस्तरी, देवकांत चौधरी आदी उपस्थित होते. मुकुंदराव चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ कल्पना ताई मुकुंदराव चौधरी यांचे शुभहस्ते आरती करण्यात आली.