*पंचायतराज समितीचा चोपडा तपासणी दौऱ्यात उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेचा पर्दाफाश.. शिक्षण विभागावर प्रश्नांचा भडीमार.. अनियमिततेच्या बाबी रेकॉर्ड वर घेण्याचे आश्वासन*



 





*पंचायतराज समितीचा चोपडा तपासणी दौऱ्यात  उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेचा पर्दाफाश.. शिक्षण विभागावर प्रश्नांचा भडीमार.. अनियमिततेच्या बाबी रेकॉर्ड वर घेण्याचे आश्वासन* 

चोपडा दि.२८(प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायतराज समितीचे चोपडा तालुक्यास सकाळी 11 वाजेच्या सुमारास निमगव्हाण येथील जि.प. केंद्र शाळेस भेट दिली तेथून 12 वाजेच्या सुमारास चोपडा पंचायत समिती येथे आगमन झाले. यात संजय रायमुलकर (समिती प्रमुख), महादेव जानकर (समिती सदस्य), आठवले (विधिमंडळ उपसचिव), शेखर निकम (समिती सदस्य) कृष्णा गजबे (समिती सदस्य) म्हणून उपस्थित होते.


नागरिकांच्या समस्यांबाबत निवेदनाची पडली भर


चोपडा तालुक्यातील नागरिकांनी वेगवेगळ्या समस्यासंदर्भात पंचायतराज समिती प्रमुखांना निवेदन दिलेत यात प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालयात चोपडा येथील अस्वच्छता, बोगस बांधकामाची अदा करण्यात आलेली बिल, जनावरावरील लिम्पि आजाराची उपलब्ध नसलेली लस, जि.प. शाळांमधील घटती पटसंख्या,शेतकऱ्यांच्या अतिपावसामुळे उशिरा मिळणारी नुकसान भरपाई, शासकीय कर्मचाऱ्यांनी बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून घेतलेला लाभ, आरक्षण धोरणाचे पालन न करणाऱ्या शाळा अशा अनेक समस्या समितीसमोर लेखी अर्जाद्वारे सादर करण्यात आल्यात


शिक्षण विभागावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली गेली पंचायतराज समिती सदस्यांनी सन 2017 पासूनच्या कामाची सखोल चौकशी शिक्षण विभाग प्रमुखाकडून करण्यात आली.

या चौकशीत अनेक विषय समजून घेण्यात आले सर्व नियोजन व्यवस्थित असल्याने सर्व प्रश्नांची सखोल उत्तरे पंचायतराज समिती सदस्यांना चोपडा पंचायत समितीच्या विभागाकडून देण्यात आलीत.


पंचायतराज समितीची निमगव्हाण येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेस भेट देण्यात आली यावेळी यावेळी पंचायतराज समितीकडून शाळा स्थापना,बांधकाम,16 कलमी गुणवत्ता विकास कार्यक्रमासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती स्थापन नसल्याचे तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी पंचायतराज समिती सदस्यांना केली त्याबाबत पंचायत राज समितीने सखोल चौकशी करण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती स्थापन नसल्याने पंचायतराज समितीचे प्रमुख यांनी नाराजगी व्यक्त केली.

2016 2017 चा प्रशासन अहवाल तपासणीअंती आक्षेपांवर सखोल चर्चा पंचायत राज समिती दौऱ्यामध्ये करण्यात आली अनेक ठिकाणी चालू कामांमध्ये अनियमितता अशा प्रकारच्या तक्रारी आम्हास मिळाल्या या तक्रारींची उद्याच्या कामकाजात रेकॉर्डवर दखल घेऊन जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना आदेश देऊ चोपडा तालुक्यात काही कामांमध्ये अडचणी आढळल्यात, शासनाच्या निकषात बऱ्याच ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे, काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या भेटी वेळेवर नाहीत अशा आमच्या निदर्शनास आले आहे. अशा सर्व बाबीं आम्ही रेकॉर्डवर घेऊन त्यांची चौकशी करू तसा अहवाल आम्ही देऊ असे समिती प्रमुख संजय रायमुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने