चांदवडच्या झोपलेल्या नगरपरिषदेला नाल्यातील डास चावल्यावर जाग येईल का?

 




चांदवडच्या झोपलेल्या नगरपरिषदेला नाल्यातील डास चावल्यावर जाग येईल का?


चांदवडदि.२७( शहर प्रतिनिधी- संदीप पाटील)

चांदवड शहर बस स्टँड शेजारी असलेला नाला व गुजराथी नगर जवळून वाहणारा सांडपाण्याचा नाला यात प्रचंड झाडेझुडपे वाढलेली असून सायंकाळी त्यातनं मोठ्या प्रमाणात डास बाहेर पडतात व आजूबाजूला  असलेल्या नागरिक,व्यावसायिक यांना प्रचंड डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या अनेक नागरिक चिकूनगुण्या आजाराने ग्रस्त आहेत,मात्र नगरपरिषद टाळत असलेल्या  स्वछतेविषयी बोलायला सहसा कोणीच हिम्मत करत नाही.

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार व पदाधिकारी यांनी नगरपरिषदेत स्वतः कार्यकर्ते घेऊन निवेदन दिले होते त्यानुसार नगरपरिषद खरोखरच प्रलंबित कामे पूर्ण होतात की नाही हे काही दिवसातच समजेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने