महाविकास आघाडीच्या बैठकीत भाजपाला पराभव करण्याचा सूर..






महाविकास आघाडीच्या बैठकीत भाजपाला पराभव करण्याचा सूर..


 *शिंदखेडा दि.२७ (प्रतिनिधी): आज दि. २७ सप्टेंबर रोजी शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. यात महाविकास आघाडीच्या तालुक्यातील सर्वच उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री संदीप दादा बेडसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री शाम दादा सनेर व शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री हेमंत रावसाहेब साळुंखे यांनी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन व सूचना केल्यात.*या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या वतीने भाजपला पराभव करण्याचा एकच सुर सर्वच नेत्यांनी लगावला.*राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने