*केळी उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी..बोर्ड भावा प्रमाणे दर फलक लावावा.तहसिल दालनात बैठक संपन्न*
चोपडा दि.०१(प्रतिनिधी ) केळी उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी व केळी मालाला बोर्ड भाव मिळावा यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदार अनिल गावित यांचा सोबत एम व्ही पाटील सर (मा. उपसभापती) केळी पिक विमा तक्रार निवारण समिती सदस्य तसेच मार्केट कमिटीचे सभापती श्री दिनकराव देशमुख तसेच केळी व्यवसाय करणारे यापारी यांचाशी चर्चा करण्यात आली तसेच निवेदन देण्यात आले.
बैठकी मार्केट कमिटी यांनी आपला बोर्ड भाव स्वतःजाहीर करावा, बोर्ड भावा प्रमाणे भाव देण्यात यावे तसेच ज्याचा कडे लायसन्स आहे अशा व्यापारींना माल देण्यात यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.यावेळी परिसरातील शेतकरी पांडुरंग पाटील, भटु पाटील, नामदेव पाटील, सुधाकर पाटील, डॉ मनोज पाटील विटनेर, डॉ संजय पाटील , सोपान पाटील, मच्छिद्र पाटील , कैलास पाटील, जीतु पाटील, बाळु पाटील, तुषार पाटील, पाटील भरत पाटील, विटनेर, वढोदा, दगडी, मोहिदा या गावातील तसेच परीसरातील शेतकरी उपस्थित होते*