सुदर्शन कॉलनीत गुणवंत विद्यार्थ्यांनच्या सत्कार

 




सुदर्शन कॉलनीत गुणवंत विद्यार्थ्यांनच्या सत्कार

चोपडा दि. ०१( प्रतिनिधी):   सुदर्शन कॉलनी चोपडा येथे विविध उपक्रमांना वाव देत श्रीकृष्ण जन्मअष्टमी च्या दिवशी शहरातील प्रभावीपणे काम करणारे व सर्वाना आपलेच वाटणारे पोलीस निरीक्षक मा श्री औतरसिह चव्हाण साहेब तसेच चोपडा शहराच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असणारे गटनेते नगरसेवक मा श्री जीवन भाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते कॉलनीतील गुणवंत विद्यार्थ्यांनच्या सत्कार करण्यात आला तसेच कॉलनी च्या विकासासाठी अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात सहविचार सभा संपन्न झाली 

        सर्वानीच सहकार्य केल्यामुळेच सुदर्शन कॉलनी च्या विकास हा निश्चितच होणार असा विश्वास आलेले अतिथी यांनी व्यक्त केले तसेच कॉलनीच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले

          सदर मीटिंग मध्ये प्रथम आलेल्या पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला त्यानंतर कॉलॉनीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला वाढदिवस साजरा करण्यात येऊन खालील विषयावर चर्चा करण्यात आली

1. पिण्याच्या पाण्याचा वेळ आणि वार निश्चित करणे.

2.ओपन स्पेस मध्ये आपल्या कॉलनी साठी बोरवेल करणे व नगरपालिका चोपडा यांच्या कडुनच मोटार व इले मीटर  मंजूर करून घेणे

3 आपल्या कॉलनीतील आपल्या सर्वांच्या हक्काच्या ओपन स्पेस आपल्या ताब्यात घेऊन गट न 916 मधील ओपन स्पेस मध्ये गार्डन व गट न 915 मधील ओपन स्पेस मध्ये भव्य मंदिर उभारणे यावर सर्वांनि एकमताने संमती दिली

4 मा जीवन भाऊंच्या मदतीने कॉलनीत रस्ते व गटारी नव्याने मंजूर करून घेणे.

5 कॉलनीत ओपन स्पेस मध्ये बाक बसण्यासाठी नगरपालिका कडून मंजूर करून घेणे                                  

6 कॉलोनी परिसरातील शाळेस श्री करोडपती सर यांच्या माध्यमातून शाळेने येत्या 3 महिन्यात  कंपाऊंड वॉल करणे 

 7 सुदर्शन कॉलनी च्यादोन्ही बाजूस कॉलनी च्या बोर्ड लावणे

8 कॉलनीत गणपती मंडळाची स्थापना करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली

   🙏 वरील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी व सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉलनीतील सर्व लहान थोर तरुण जेष्ठ मंडळींनी सहकार्य केले असेच सहकार्य कायम करीत रहावे जेणेकरून कॉलनी च्या विकास होत राहिल 🙏

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने