*परिसपार्क परिसरातील रस्त्यांवर प्रचंड मोठा खड्डा.. तात्काळ* *मुरूम टाकावा रहिवाशांची मागणी**

 *



 परिसरातील रस्त्यांवर प्रचंड मोठा खड्डा.. तात्काळ* *मुरूम टाकावा रहिवाशांची मागणी** 


चोपडा दि.०१(प्रतिनिधी) चोपडा शहरातील काही काॕलनी भागात रस्त्याचे मधोमध मोठं मोठी खड्ड्यांची संख्या वाढल्याने नगरवासियांना पायी चालणे नाके नऊ येत असल्याने प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.तरी नगरपालिकेने त्वरीत लक्ष घालून मुरूम टाकून खड्डे भराई करून घ्यावी अशी मागणी होत आहे

चोपडा शहरातील देशमुखनगर,शिवाजी नगर,परिसपार्क,हेमलतानगर मधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे चालणेही मुश्किल झाले आहे वास्तविक पाहता नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी हे डागडुजी करून घ्यायला हवी होती . "आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातयं " असा कारभार होऊ पाहत असल्याने नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नगरवासियांतर्फे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने