खळेश्वर महादेव परिसरातील हिंदू स्मशानभूमी ची राजकीय द्वेशा पोटी झाली दुरवस्था; लक्ष देण्यासाठी नगर परिषदेला दिले निवेदन

 





खळेश्वर महादेव परिसरातील हिंदू स्मशानभूमी ची राजकीय द्वेशा पोटी झाली दुरवस्था; लक्ष देण्यासाठी नगर परिषदेला दिले निवेदन


अमळनेर,दि.२०( प्रतिनिधी)

अमळनेर येथील बहादरपूर रोडवरील खळेश्वर मंदिरासमोरील हिंदू स्मशानभूमी महाराष्ट्र शासनाच्या विकास योजनेअंतर्गत माजी आमदार दादासो शिरिष चौधरी यांच्या प्रयत्नातून सस्मशानभूमी (वैकुंठधाम) निर्माण झाले असून झालेले बांधकाम अमळनेर नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे सदर स्मशानभूमी ही सध्या स्थितीत अड्डा झालेला आहे. चोरट्यांनी ह्या ठिकाणी असलेल्या दशक्रिया विधी हॉलच्या नळाच्या तोट्या तोडून चोरून नेलेल्या आहेत तसेच वस्तू शोधण्यासाठी अंत्यसंस्कार केलेल्या प्रेताची अास्तीही इकडे तिकडे फेकून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तसेच स्मशानाच्या बैठक शेड, दहन ओटे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घाण झालेले असून बेवारस गुरेढोरे ही येथे फिरत असतात सदर स्मशान बेवारस असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे खळेश्वर स्मशान भूमी वैकुंठधाम च्या देखरेखीसाठी नगरपरिषदेने कायमस्वरूपी माणसाची नियुक्ती करावी व नगर परिषदेकडून अंत्यसंस्कारासाठी मिळणारे सरपंन (लाकूड)चा डेपो त्याठिकाणी निर्माण करावा व चोरट्यांनी चोरून नेलेल्या नळाच्या तोट्या बसविण्यात येऊन परिसरात वृक्षारोपण करून स्मशानभूमी संरक्षण कुंपण व्हावी याठिकाणी नगरपरिषदेने कायमस्वरूपी माणूस नेमून देखबाल करावी लाईट ची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील प्रभाग क्रमांक 15,16,17 यामधील नागरिकांकडून करण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावतीने गायकवाड साहेब यांना देण्यात आले. यावेळी क्षत्रिय काच माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर भगवान महाजन ,गंगाराम निंबा महाजन,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष प्रताप पाटील, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव महाजन,माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग नामदेव महाजन ,नगरसेवक देविदास भगवान महाजन, उपाध्यक्ष मनोहर महाजन, माजी उपनगराध्यक्ष अनिल गंगाराम महाजन गुलाब ओंकार महाजन राजेंद्र भास्कर महाजन , रविंद्र ओंकार महाजन बाबूलाल राहुल महाजन सर समाजसेवक साखरलाल महाजन सर आदी उपस्थित होते यावेळी निवेदनात दहा दिवसात जर नगरपालिकेने योग्य ती कारवाई केली नाही तर मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा असा इशारा परिसरातील नागरिकांनी उपमुख्याधिकारी गायकवाड साहेब यांना देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने