*अकुलखेडा गावात शेतमजुरांचे शोषण! फक्त १००₹मजुरी? शेतमजुरांचा बेमुदत संप सुरू!! लालबावटा शेतमजूर युनियन चा पाठिंबा...!*

 










*अकुलखेडा गावात शेतमजुरांचे शोषण! फक्त १००₹मजुरी? शेतमजुरांचा बेमुदत संप सुरू!! लालबावटा शेतमजूर युनियन चा पाठिंबा...!*

 *चोपडा..दि.२०(प्रतिनिधी)* तालुक्यातील अकुल्खेडा येथील२००० शेतमजुरांना पावसाळ्यात हंगामात सहा तासाचे कामाचे फक्त शंभर रुपये वेतन देऊन  त्यांची पिळवणूक केली जात आहे. या पिळवणूकीचा लाल बावटा शेतमजूर युनियनने निषेध केला आहे. या शेतमजुरांना अकुलखेडा गाव परिसरातील गावांमध्ये व्यवहारा नुसार जे वेतन दिले जाते.

 ते स्त्री मजुरांना किमान  दोनशे रुपये व पुरुष मजुरांना तीनशे रुपये वेतन द्यावे पी एम किसान सन्मानधन धरतीवर *शेतमजूर सन्मान मानधन* द्यावे अकुलखेडा गाव. परिसरात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी व शेतमजुरांना उज्वल गॅस लाभ ,कोविड काळ संपत नाही तोपर्यंत किमान एक हजार रुपये रोख रक्कम आदी मागण्यांना घेऊन शेतमजुरांनी अकुलखेडा ग्रामपंचायतीला आज  सोमवार दिनांक 20 सप्टेंबर 2021 पासून शेतमजूर बेमुदत संपावर जात असल्याचा इशारा देणारा मोर्चा  लाल बावटा शेतमजूर युनियन राष्ट्रीय कमिटी मेंबर कामरेड अमृत महाजन युनियनचे तालुका सचिव कामे रेड  गोरख वानखेडे वढोदा ,संघटिका हिराबाई सोनवणे, नागलवाडी श्री रमेश महाजन चोपडा, यांच्या मार्गदर्शनात अकूलखेडा ग्रामपंचायत वर काढण्यात आला. संपाचे निवेदन  ग्रामपंचायतचे सरपंच  श्री लक्ष्मण बाविस्कर ग्राम विकास अधिकारी श्री विसावले उपसरपंच योगेश पाटील विकास पाटील श्याम पाटील, ज्येष्ठ सदस्य अनंत महाजन यांनी स्वीकारले निवेदन देतेवेळी सर्वश्री कॉम्रेड महाजन, गोरख वानखेडे ,रमेश महाजन, हिराबाई सोनवणे, शाखाध्यक्ष गुरुदास मोरे उपाध्यक्ष किशोर पाटील सचिव संगीता धनगर सदस्य  अलका पाटील कमलबाई भील रजुबाई कोळी ,गोपाळ माळी, अनिता पाटील, वैशाली जगताप सुरेखा अहिरे, उशाबाई पाटील  आदी हजर होते. याबाबत सविस्तर असे की, अकुलखेडा गावांमधील शेतमजुरांच्या वेतन वाढ प्रश्नावर यापूर्वी दोन मोठे संप होऊन गेले आणि तिसऱ्यांदा शेतमजुरांना संपाची पाळी येणे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे .  नाईलाजास्तव  सोमवारपासून शेतमजुरांचे वेतन वाढ म्मागणी साठी अकुलखेडा गावात बेमुदत संपाचा एल्गार पुकारण्यात   येत आहे .असे प्रतिपादन  शेतमजूर युनियन तर्फे जाहीर केलेल्या पत्रकात केले आहे त्यात असेही म्हटले आहे की,  *"शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट जरी आले असले तरी त्याची झळ शेतमजुरांच्या वर काढणे योग्य नाही"*  असे पत्रकात  नमूद केले आहे ..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने