एलआयसीचे प्रशासनिक अधिकारी राजेंद्र नेवे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त ....
चोपडा प्रतिनिधी (राजेंद्र पाटील ):---
भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी शाखा चोपडा येथील सुपरवायझर प्रशासनिक अधिकारी राजेंद्र लक्ष्मण नेवे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त झाले. त्यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन पंकज विद्यालयात करण्यात आले होते .
सेवापुर्ती सोहळ्यास उपस्थित महेंद्र ठाकूर (शाखाधिकारी) , डॉ सुरेश बोरोले (अध्यक्ष - पंकज समूह ) , एम व्ही पाटील (माजी उपसभापती पंचायत समिती ) , डी जी पाटील ( निवृत्त विकास अधिकारी) , एस एन धोपेकर (माजी शाखाप्रमुख) , सतीष भगत (प्रशासनिक अधिकारी) , शांताराम पाटील (माजी कॅशीअर ) , किरण पाटील (विमा सल्लागार एम डी आर टी) , अशोक साळुंखे , संजीव बाविस्कर , आर डी पाटील (पत्रकार) यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते राजेंद्र नेवे यांच्या सेवापुर्ती निमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
राजेंद्र नेवे यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळात सहाय्यक क्लर्क पासून नोकरीने प्रारंभ केला होता .त्यांची नोकरीची सुरुवात चोपडा शाखे पासून झाली होती व निवृत्त देखील ते चोपडा शाखेतूनच निवृत्त झाले .मधल्या काळात दोंडाईचा , पारोळा येथे त्यांनी सेवा दिली. त्यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळस कुटुंबाचे स्थान दिले . त्यांची आपल्या कामावर खूप निष्ठा होती .विनाकारण रजेवर न जाता शेवटच्या क्षणापर्यंत , दिवसापर्यंत त्यांनी सेवा दिली .ज्याप्रमाणे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे बोधवाक्य आहे ,योगक्षेमं वहाम्यहम् म्हणजे तुमची समृद्धी - आमचे कर्तव्य याप्रमाणे त्यांनी प्रत्येक गिऱ्हाईकांची समृद्धी होण्यासाठी आपले कर्तव्य चोखपणे बजावले आहे त्यांनी वेळेला व कार्यतत्परतेला नेहमीचे प्राधान्य दिले. त्यांची काम करण्याची पद्धत ,मांडणी व टायपिंग इत्यादी गुण वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्या चेहर्यावर नेहमी हास्य असते. त्यांच्याकडे पाहिल्यावर नेहमी उत्साह वाढतो त्यांच्या कार्याविषयी व अनेक गुणांविषयी उपस्थित वक्त्यांनी कौतुकास्पद वक्तव्ये केली .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजीव बाविस्कर, अशोक साळुंखे ,आर डी पाटील ,तुषार प्रमोद नेवे, तेजस्विनी तुषार नेवे, अक्षय राजेंद्र नेवे, तेजस्विनी अक्षय नेवे आदींनी परिश्रम घेतले.....