आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते.. आदर्श कोतवाल जितुभाऊ धनगर यांचा यथोचित सत्कार
चोपडा दि.०२(प्रतिनिधी):
"जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कोतवाल" म्हणून जितूभाऊ धनगर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आज पुष्पगुच्छ व शॉल देऊन आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख रोहिणीताई पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, महिला तालुका प्रमुख मंगलाताई पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, गणेश पाटील, संतोष अहिरे, अनिल बाविस्कर,दिव्यांक सावंत हे उपस्थित होते.