शासन परिपत्रकानुसार "सरपंच सभा" लवकर घ्या...डॉ सुनिल पाटील यांची पीआरसी कडे मागणी !

 



शासन परिपत्रकानुसार "सरपंच सभा" लवकर घ्या...डॉ सुनिल पाटील यांची पीआरसी कडे मागणी !

मनवेल ता.यावल दि.30( वार्ताहर )

शासन परिपत्रकानुसार गटविकास अधिकारी यांना तालुका पातळीवर दर 3 महिन्यांनी सरपंच सभा घेण्याची अंमलबजावणी करणेबाबत निवेदन साकळी येथील डॉ. सुनिल पाटील यांनी पीआरसी कमिटीला केले आहे.

सविस्तर वृत्त असे की ग्रामविकास विभागाच्या 9 फेब्रुवारी 21 रोजीच्या शासन परिपत्रक  क्र. व्हीपीएम 2020/प्रक्र/161/पं.रा.-3 दि 9 फेब्रुवारी 2021 नुसार राज्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दर 3महिन्याला "सरपंच सभा" घेणे आदेशीत केलेले आहे.

ग्रामपंचायतींचे कामे वेळेवर होवून पंचायत समिती स्तरीय गट विकास अधिकारी , विस्तार अधिकारी, इतर सर्व अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील सर्वच सरपंच, ग्रामसेवक यांच्यामध्ये दुवा साधला जाऊन गतिमान ग्रामविकासास चालना मिळावी यासाठी सरपंच सभा घेणे अत्यावश्यक आहे , तसेच झालेल्या सरपंच सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. व विभागीय आयुक्त तसेच शासनास  सादर करणे आवश्यक आहे असे संबधित परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पण  जळगाव जिल्ह्यात व विशेष करून यावल तालुक्यात शासन परिपत्रक निघाल्याच्या 8 महिनानंतरही कोणतीही सरपंच सभा आयोजित करण्यात आली नाही.  एकप्रकारे शासन परिपत्रकाची अवमान आहे. आता कोविड बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला असून ऑफलाईन किंवा ऑनलाइन "सरपंच सभा" घेण्यासाठी पीआरसीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.जळगाव व गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांना  लवकरात लवकर सरपंच सभा घेण्याबाबत आदेश देण्यात यावेत, ही विनंती भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. सुनिल पाटील यांनी पीआरसी कमिटी चे अध्यक्ष मा.आ. डॉ. संजय रायमुलकर यांचेकडे निवेदनाद्वारे जळगाव जिल्हा दौऱ्यावर कमिटी आली असतांना प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.कमिटीचे सदस्य आ.अनिल पाटील, आ.अंबादास दानवे, आ.सदाभाऊ खोत, आ.महादेव जानकर, आ.किशोर पाटील, आ.प्रदिप जैस्वाल यांनी सरपंच सभेबाबत मागणी अतिशय योग्य असल्याचे सांगितले व लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सदर निवेदनाची प्रत  म.मंत्री , ग्रामविकास (म.रा.)मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,विरोधी पक्षनेते, विधानसभा मा.अतिरिक्त मुख्य सचिव,ग्रामविकास व पंचायत राज मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.जळगाव मा.गटविकास अधिकारी, प.स. यावल यांना देण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने