जळगावसह चोपड्यातील महिलांसाठी खुशखबर..! ट्रेनिंग व लायसन्ससह 'पिंक रिक्षा' तुमच्या ताब्यात.. फक्त हवी आहे ती तुमच्यातली जिद्द.. गुलाबी रिक्षा चालविण्याचे सिनेमातले दृश्य आपल्या शहरातही दिसणार.!

  






जळगावसह चोपड्यातील महिलांसाठी खुशखबर..! ट्रेनिंग व लायसन्ससह 'पिंक रिक्षा' तुमच्या ताब्यात.. फक्त हवी आहे ती तुमच्यातली  जिद्द.. गुलाबी रिक्षा चालविण्याचे सिनेमातले दृश्य आपल्या शहरातही दिसणार.!


चोपडा - दि.30(प्रतिनिधी)

समाजाप्रती कृतज्ञतेची भावना मनाशी बाळगून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या हेतूने इंटरनॅशनल इनरव्हील क्लब सतत प्रयत्नशील असतो. यावेळी देखील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी (चोपडा) व  जळगाव येथील खुशाल ऑटोमोबाईल यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील होतकरू महिलांसाठी 'पिंक फर्स्ट' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत जळगाव शहरासह जिल्ह्यातील तरुणी व महिलांना स्वबळावर समाजात आपले स्थान निर्माण करता यावे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

         त्यासाठी अश्विनी गुजराथी व खुशाल ऑटोमोबाईल यांनी ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत १०० पिंक रिक्षा वितरित करण्याचा संकल्प केला आहे. शहरासह जिल्ह्यातील ज्या तरुणी व महिला रिक्षा व्यवसायात येण्यास इच्छुक आहेत त्यांना रिक्षा चालवण्याचे ट्रेनिंग देणे, लायसन्स काढण्यास मदत करणे, बॅच, परमिट व नवीन रिक्षा घेऊन देण्याकरता आर्थिक सहकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात समन्वय करून देणे यासाठी सहकार्य करण्यात येईल.

      'पिंक रिक्षा' महिलांकरिता उत्पन्नाचे चांगले साधन होऊ शकते. 'पिंक रिक्षा' या मुलांना व महिला प्रवाशांना ने-आण करण्याकरिता सुरक्षित असणार आहेत. इतर शहरांमध्ये 'पिंक रिक्षा' या मोठ्या प्रमाणात असून जळगाव शहरातील तरुणी व महिलांनी या व्यवसायात यावे, असा संकल्प अश्विनी गुजराथी व खुशाल ऑटोमोबाईलचे संचालक यांनी केला असून अधिक माहितीसाठी ७४९९१६७०८८, ८३७८८४८०६३, ९३०७१००२६२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने