आयटीआय (ITI) च्या परिक्षार्थीबाबत शासनाची दुटप्पी भूमिका विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी.. योग्य ती दखल घ्या प्राचार्य दिव्यांक सावंत यांची लक्षवेधी विनयशील मागणी


 


*आयटीआय (ITI) च्या परिक्षार्थीबाबत शासनाची दुटप्पी भूमिका विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी.. योग्य ती दखल घ्या प्राचार्य दिव्यांक सावंत यांची लक्षवेधी विनयशील मागणी

चोपडा दि.३० (प्रतिनिधी): आयटीआय च्या परिक्षा  शासनाने ऑनलाईन केल्यात परंतु विद्यार्थ्यांसाठी दुटप्पी भूमिका घेत त्यांचे पेपर हे कॉम्प्युटर सेंटर व दुसऱ्या लांब पल्ल्याच्या  अंतर असलेल्या आयटीआय च्या ठिकाणी घेतलयाने,तिथली काहीच माहिती त्या विद्यार्थ्यांना नसते आणि जे परिक्षा केंद्र ५० किमी अंतरावर असतात अशा ठिकाणी पोहचून त्यांना एखाद्या स्किल, परिपुर्ण नोलेज असलेल्या विद्यार्थ्यांसारखे पेपर लागत असल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.परिणामी विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण वाढल्याने  नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे तरी शासनाने ही बाब  तात्काळ लक्षात घेण्याची गरज असल्याची माहिती श्री संत गजानन बहु.संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य दिव्यांक सावंत यांनी दिली आहे.

आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) महाराष्ट्र राज्य भरात जवळपास ४०० सरकारी तर खाजगी ५०० आहेत.सर्व साधारण घरातील विद्यार्थी हे या शैक्षणिक क्षेत्रात वळतात ज्यांना कमीत कमी खर्चात हे शिक्षण लवकरात लवकर घेऊन घर चालवायचे असते.जी मुले अभ्यासात कमी असतात अशा मुलांची संख्या या क्षेत्रात जास्त असते.तर मुद्दा हा आहे की आयटीआयच्या परिक्षा ह्या आधी सहामयी पध्दतीने लेखी स्वरुपात व्हायच्या त्यानंतर वार्षिक लेखी स्वरुपात झाल्या.कालांतराने सर्वच शैक्षणिक क्षेत्र १ली पासून ते इंजिनिअरींग ते एमबीए ऑनलाईन झाले तेही कोरोना मुळे.जवळपास सर्व च  शैक्षणिक क्षेत्रातील मुलांनी घरुनच मोबाईल वर पेपर दिलेत.त्यामुळे आयटीआय च्या परिक्षाही शासनाने ऑनलाईन केल्यात परंतु शासनाने या विद्यार्थ्यांसाठी दुटप्पी भूमिका घेत त्यांचे पेपर हे कॉम्प्युटर सेंटर व आयटीआय च्या ठिकाणी घेतले.जे सेंटर दुसऱ्या तालुक्यात आहेत,जिथली काहीच माहिती त्या विद्यार्थ्यांना नसते,जे परिक्षा केंद्र ५० किमी अंतरावर असतात अशा ठिकाणी पोहचून त्यांना एखाद्या स्किल, परिपुर्ण नोलेज असलेल्या विद्यार्थ्यांसारखे पेपर त्या ठिकाणी द्यावे लागतात.तिथले शिक्षक ५-१०मिनटे उशीर ही झाला तर मध्ये घेणार नसल्याने भाडे खर्चुन दुसऱ्या तालुक्यात घाईघाईने जा व पेपर द्या आणि घरी या.चला पेपर एकठोक सर्व मुलांचे असते तर त्यांनी गाडी केली असती तर तसेही नाही पेपर हे एका आयटीआय मधील ५-५ ,३-३ या बॅच प्रमाणे येतात.आधीच गरीब परिस्थितीतील मुले अनेकांची  आर्थिक परिस्थिती नसल्याने व शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांना कॉम्प्युटर चे ज्ञान नाही.ही सत्य परिस्थिती आहे ही लपवून चालणार नाहीअसेही त्यांनी स्पष्ट केले आहे

आयटीआयच्या परिक्षा ह्या  इतर क्षेत्रांतील विद्यार्थ्यांप्रमाणे यांच्या ही परिक्षा ह्या मोबाईल वर घ्याव्यात.नाहीतर कमीत कमी त्या ज्यात्या  तालुक्याच्या ठिकाणी व्हाव्यात.त्यांचा होणारा मनस्ताप टळेल, पैसा वाचेल.घाईघाईत होणारी पळापळ टाळून जर काही होणार विघातक परिणाम टाळता येतील.असेहि त्यांनी नमूद केले आहे

शासनाने आयटीआयची मुले व इंजीनियरिंग ची मुले यांतील फरक ओळखुन त्यांनाही पेपर मोबाईल वरच ऑनलाईन करावेत.व कोरोना काळानंतर हे पेपर पुर्विनुसार करावेत.अशी  विनंती शासनाने कडे केली आहे




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने