शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन पोषण महा चे कार्यक्रम सोत्साहात

 



शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन पोषण महा चे कार्यक्रम सोत्साहात 

म्हसावद,ता.शहादा:(प्रतिनिधी  अब्बास भिल ): शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन येथे दि.28 सप्टेंबर रोजी शासन आदेशान्वये पोषण महा चे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्ष स्थानी जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड  हे होते तर प्रमुख  पाहुणे म्हणून नंदुरबार बाल कल्याण समिती चे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सजा प्राप्त  विठ्ठलराव कदम,नंदुरबार कृषी विज्ञान चे विशेष विषय तज्ञआरती देशमुख,नंदुरबार  यूनिसेफ  जिल्हा समन्वयक नितीन वसईकर हे होते.

     यावेळी  प्रमुख पाहुण्याचे सत्कार रोप,गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रजवलीत करून  उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्तविक अश्विनी करंके यांनी केले तर सूत्रसंचालन मिलन पाटील यांनी केले.

    या कार्यक्रम अंतर्गत सविस्तर  पोषण महा चे मुख्य उद्देश समजावत त्यात पोष्टिक आहार, स्तनपान, पूरक आहार , लसीकरण , लग्नाची योग्य वय, कुटुंब नियोजन , धूम्रपान या बद्दल सविस्तर माहिती  नंदुरबार बाल कल्याण समिती चे अध्यक्ष विठ्ठलराव कदम   यांनी दिली. नंदुरबार कृषी विज्ञान चे विशेष विषय तज्ञआरती देशमुख वरील मुद्द्यांवर व पोषण वाटिका,कमी श्रमाचे हत्यार तसेच महिलांचे पोषण चिमहिती गावातील उपस्थित महिला  यांना समजावून सांगितले तदनंतर कुपोषण बद्दल सविस्तर माहिती सांगितली लोकांच्या मनातील गैरसमज दूर केल्या.जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड पोषण महा विषयी योग्य ती मार्ग दर्शन केले.

दरम्यान  आदींनी महिला वर्गांना कुपोषित बालकांना बद्दल विशेष असे माहिती दिली.प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी करंके,म्हसावद प्रकल्पातील पर्यवेक्षिका संगिता खेडकर,शहादा चे रणजित कुरे,शशिकांत पाटील,    अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.पोलीस पाटील दशरथ बर्डे,नर्मदा बचाव आंदोलन चे कार्यकर्ते सुनील पावरा,अनिस पिंजारी,जमान ठाकरे,आदी उपस्थीत होते.सर्व अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार याचे प्रात्यक्षिक करून स्वयंपाक तयार करून आणला होता व त्याबद्दल माहिती ही दिली मोड आलेले धान्य नियमित आहार मध्ये खाल्ले पाहिजे याची सुद्धा माहिती दिली, बाहेरचे खाणे टाळावे व त्याचे दुष्परिणाम काय होतात हे देखील सांगितले

 कार्यक्रमात रांगोळी प्रदर्शन व सर्व प्रकारच्या वन भाज्या सर्व प्रकारचे कडधान्य यांचे प्रदर्शन आयोजित केले होते.कार्यक्रमात यावेळी चिखली च्या अंगणवाडी सेविका चिमा नाईक व कविता वसावे,मदतनीस रंजना नाईक व सोनी वसावे,पाडळदा च्या सेविका कोकिळा गिरासे,आशा ठाकरे,भावना जाधव,पुष्पा पटेल, पिंपरी च्या सेविका रेखा सोनवणे, मोहिदा सेविका सुशीला पाटील,तिखोरा सेविका माया माणिक,आशा भिल,मनीषा रामराज्ये,म्हसावद च्या सेविका मंगला पावरा,चंद्रकला चव्हाण,ताराबाई पाटील,लक्ष्मी धाडणेकर, रेखा पावरा,प्रतिभा न्याहडे,रंजना बैसाणे,कांता ठाकरे, गावातील महिला व गावातील इतर महिला उपस्थित  होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने