थोर विचारवंतांच्या आदर्श विचार अंगिकारा.. नुसते प्रतिमा पूजन करण्यात धन्यता मानू नका..माजी प्राचार्य डॉ एल ए पाटील यांचे प्रतिपादन

 



थोर विचारवंतांच्या आदर्श विचार अंगिकारा.. नुसते प्रतिमा पूजन करण्यात धन्यता मानू नका..माजी प्राचार्य डॉ एल ए पाटील यांचे प्रतिपादन

      चोपडा दि.१८ (प्रतिनिधी) :----

          समाज विकासामध्ये शिक्षक व थोर पुरुषांचा वाटा मोलाचा आहे . त्यांनी मुल्ये जपली म्हणूनच आज शिक्षण व्यवस्था सुदृढ आहेत . त्यागातूनच कीर्ती प्राप्त होते , महापुरुषांनी अनेक गोष्टींचा त्याग केला , बलिदान दिले म्हणून आज आपण फुले - शाहू - आंबेडकरांसह अनेक थोर पुरुषांचा चरित्रांची पूजा करतो , त्यांच्या चित्रांची नव्हे असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ एल ए पाटील (प्रताप महाविद्यालय अमळनेर व नॅनो संशोधक ) यांनी

 रोटरी क्लब ऑफ चोपडा आयोजित गुणवंत शिक्षक व विद्यार्थी गुण - गौरव सोहळा कार्यक्रम प्रसंगी "गुणवंत की यशवंत" ह्या विषयावर बोलतांना केले..

         सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले , मानद सचिव रोटे प्रविण मिस्त्री , रोटे एम डब्ल्यू पाटील ( एनक्लेव चेअर ) , पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले , डॉ  मोनिया केदार (मिस इंडिया) , रोटे विलास पी पाटील ( प्रकल्प प्रमुख - नेशन बिल्डर अवॉर्ड ) , गौरव महाले ( प्रकल्प प्रमुख - गुणवंत विद्यार्थी सोहळा) आदि मान्यवर उपस्थित होते.

         डॉ एल ए पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, मानव विकासाचे टप्पे माहित असावेत . त्यात मोक्ष म्हणजे पूर्णत्वाची अवस्था असते. मूल्ये दोन प्रकारची असतात , एक उच्च व दुसरे निच्च , तर आपण काय स्विकारावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यागातूनच कीर्ती प्राप्त होते . पैसा आहे म्हणून सत्ता आहे आणि सत्ता आहे म्हणून पैसा आहे आणि दोन्ही आहेत म्हणून प्रतिष्ठा आहे . सुमारे २५०० वर्षापूर्वी सॉक्रेटिस या शिक्षण  तत्त्ववेत्त्याने 

शिक्षणाची मुल्यात्मक व्याख्या केली आहे . देश खऱ्या अर्थाने बदलायचा असेल तर तरूण डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे असे मौलिक मार्गदर्शन केले. सॉक्रेटिसने उभ्या आयुष्यात सत्या शिवाय कुठेच तडजोड केली नाही. विष घेऊन मरण पत्करले तरी देखील सत्याची कास सोडली नाही .

         नितीमत्ता , सद्गुण व सदविचार यासाठी प्रत्येकाने एकदा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रोफाइल पाहिले पाहिजे असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. म्हणून जीवनात आदर्श शिक्षक महत्वाचा असतो. जगातील शिक्षण वाचवले नाही तर विश्वाची अधोगती जवळ आहे अशी भिती त्यांनी व्यक्त केली. व्यक्ती जन्माला येतो परंतू व्यक्तीमत्व निर्माण करावे लागते , व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत , माणसाने चारित्र्यवान व्यक्तीमत्व असावे . कठोर परिश्रमात सातत्य असावे . त्यांनी आपल्या मनोगतात विविध थोर पुरुषांची उदाहरणे दिलीत , अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी वयाच्या २१ व्या वर्षी अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश केला व सतत अपयश मिळत असून देखील सातत्य कायम ठेवत अखेर वयाच्या ५२ व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान झाले , मोठी यशोगाथा हि अनेक अपयशांची कथा असते असे त्यांनी सांगितले.

        नेशन बिल्डर अवॉर्ड तालुक्यांतील विविध शाळेतील १९ शिक्षकांना देण्यात आला त्यात अनिल  शिंपी - विवेकानंद विद्यालय , अंजुम अहमद शेख कमरूद्दिन - मुस्तफा अंग्लो उर्दु हायस्कूल , अशोक साळुंखे - महात्मा गांधी माध्य . विद्यालय , बालाजी घुले - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्यूनिसिपल हायस्कूल, भूपेंद्र पाटील - आर वाय चव्हाण पी बी आश्रमशाळा हातेड , दिपक शुक्ल - महिला मंडळ माध्य. विद्यालय , गोपाल पाटील - बालमोहन विद्यालय , कृष्णकुमार शुक्ल - पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल , नंदलाल वाघ - पंकज माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, नारायण बडगुजर - कै. एच एम करोडपती माध्य. विद्यालय , नितिन पाटील - माध्य कन्या विद्यालय, पुष्पा बडगुजर - विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल , रेखा पाटील - जि. प. प्राथ. शाळा भारडू , रेखा नेवे - प पू साने गुरुजी बालसंस्कार केंद्र , रेखा शिरसाळे - कस्तुरबा माध्य. विद्यालय , सदाशिव  कुळकर्णी - प्रताप विद्या मंदिर , संजय खैरनार - लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम स्कूल , श्रीकांत कोळी - क्लारा इंग्लिश मिडीयम स्कूल, उदय वानखेडे - धनाजी नाना प्रा. आश्रम शाळा सत्रासेन इत्यादी शिक्षकांना सन्मानपत्र व बुके देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीत शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

       शिक्षक प्रतिनिधीतर्फे नंदलाल वाघ यांनी मनोगत व्यक्त केले तर विदयार्थी प्रतिनिधी म्हणून स्वराली पाटील व मोनीया केदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      सदर गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी रोटरीचे सर्व सदस्य , विदयार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांनी केले . सूत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन रोटे प्रविण मिस्त्री यांनी मानले..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने