अकुलखेडा गावात शेतमजुरांचे शोषण! फक्त १००₹मजुरी? लालबावटा शेतमजूर युनियन चा संपाचा इशारा...!*

 





*अकुलखेडा गावात शेतमजुरांचे शोषण! फक्त १००₹मजुरी?  लालबावटा शेतमजूर युनियन चा संपाचा इशारा...!*

 चोपडा..दि.१८(प्रतिनिधी) तालुक्यातील अकुल्खेडा येथील शेतमजुरांना पावसाळ्यात हंगामात सहा तासाचे कामाचे फक्त शंभर रुपये वेतन देऊन  त्यांची पिळवणूक केली जात आहे या पिळवणूकीचा लाल बावटा शेतमजूर युनियनने निषेध केला आहे या शेतमजुरांना नियमानुसार किमान  दोनशे रुपये व पुरुष मजुरांना तीनशे रुपये वेतन द्यावे अन्यथा सोमवार दिनांक 20 सप्टेंबर 2019 पासून शेतमजूर बेमुदत संपावर जातील असा इशारा लाल बावटा शेतमजूर युनियन च्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या महिला शेतमजुरांच्या ग्रामपंचायत चे सरपंच  श्री लक्ष्मण कोळी सदस्य वसंत मोरे व ज्योती ताई सुनील धनगर यांचं उपस्थितीत आयोजित   बैठकीत घेण्यात आला आला आहे याबाबत सविस्तर असे की, अकुलखेडा गावांमधील शेतमजुरांच्या वेतनाचे प्रश्नांवर यापूर्वी दोन मोठे संप होऊन गेले आणि तिसऱ्यांदा शेतमजुरांना संपाची पाळी येणे यापेक्षा दुर्दैव नाही. म्हणून सोमवारपासून शेतमजुरांचे वेतन वाढ म्मागणी साठी अकुलखेडा गावात बेमुदत संपाचा एल्गार पुकारण्यात   येणार असून सोमवारी अकुलखेडा ग्रामपंचायती वर्षे यांचे निवेदन मोर्चाने दिले जाणार आहे. असे शेतमजूर नेते अमृत महाजन वासुदेव कोळी गोरख वानखेडे आरमान तडवी हिराबाई सोनवणे यांनी  जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने