शिरपूर ते वाघाडी दरम्यान रस्ते व पुलाची मोठी दुरावस्था...स्वामी विवेकानंद युवा मंडळाकडून सा.बा.भा.कार्यकारी उपअभियंतास निवेदन...*

 




शिरपूर ते वाघाडी दरम्यान रस्ते व पुलाची मोठी दुरावस्था...स्वामी विवेकानंद युवा मंडळाकडून सा.बा.भा.कार्यकारी उपअभियंतास निवेदन...*

 वाघाडी,ता.शिरपुर दि.08(प्रतिनिधी)

                शिरपूर तालुक्यातील वाघाडी ते शिरपूर या ५ कि.मी.अंतरामध्ये रस्ते व पुलावर मोठमोठी खड्डे पडले असून त्यात लवकरच सुधारणा करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन स्वामी विवेकानंद मंडळ वाघाडी यांचेकडून देण्यात आले आहे.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव तर सदस्य आदी सदस्य उपस्थित होते.

         शिरपूर ते वाघाडी कडून जाणारा राष्ट्रीय महामार्ग खुपच जीवघेणा झाला आहे. या अनेक रस्त्यावर अनेक  खड्डे पडली असून वाहन चालवताना वाहन धारकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.दरम्यान या रस्त्यावर गंभीर दुर्घटना झालेल्या असून अनेकांना तर आपले  जीवाशी देखील  मुकावे लागले आहे.परंतु तरी देखील प्रशासन याबाबतीत कमालीचे सुस्त आहे.

           वाघाडी बसस्थानकाजवळच पुल असून पुलाच्या पलीकडे शाळा आहे.हा पुल बऱ्याच पुर्वीपासूनचा असून यावर खुप मोठमोठी खड्डे तर जीर्णवस्था बाबतीत कठीणच अवस्था आहे.या पुलावरुनच राष्ट्रीय महामार्गावरील सर्व प्रकारचे जड-अवजड वाहने येत-जात असतात म्हणून या पुलाची अवस्था खुपच कठीण आहे.याचा नाहक ञास जवळपासच्या गावकरींना होत आहे.वाघाडी व सुभाषनगर या दोन गावातल्या शेतकरी,व्यापारी,सायकलस्वार,शाळकरी मुले यांच्या प्रमुख रस्ता असल्याने या लोकांना खुपच समस्यांना सामोरे जावे लागत असते.गावाच्या ग्रामस्थांना हा प्रश्न मोठा आहे की,संबंधित विभागातील पदाधिकारी फक्त काही महीने किंवा वर्ष त्यांच्यानुसार फक्त डागडुजी करून चालले जातात.परंतु या रस्त्यावरील खड्डे व पुलाची समस्या कधी मिटेल हा प्रश्न गुलदस्त्याच आहे.या रस्त्यावरील केव्हा  खड्डे कमी होतील अथवा पुलाबाबतीत केव्हा लक्ष दिले जाईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.या रस्त्यावर किंवा पुलावरचे यापुढे जर का अपघात झाले तर संबंधित विभागालाच जबाबदार धरण्यात येईल.म्हणून लवकरच दक्षता घेण्यात यावी अशा स्वरुपाचे निवेदन देण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने