ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ला ड्रेनेजसाठी निवेदन देऊनही महामार्ग अधिकारी कुंभकर्णी झोपेत*

 




*ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ला ड्रेनेजसाठी निवेदन देऊनही महामार्ग अधिकारी कुंभकर्णी झोपेत*

शिरपुर *प्रतिनिधी_(हिराभाऊ कोळी)*

सविस्तर वृत्त.. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा सावळदे ग्रामपंचायतीच्या हद्दीतुन जातो..

तसेच सावळदे ग्रामपंचायतीच्या हद्दीतुनच शिंदखेडा जाण्यासाठी चौफली आहे..

आणि त्या चौफुलीला लागुनच सर्विस रोड आहे....

हायवे व सर्विस रोडला लागुन सावळदे ग्रामपंचायतीच्या नविन वसाहत आहे..

पावसाळ्याचे पाणी हे ह्याच चौफुलीजवळ गोळा होऊन हायवेवर एक डबकारुपी तलावासारखी परिस्थिती निर्माण होते.

व ह्याच डबक्यातुन नविन वसाहतील नागरिकांना तारेवरची कसरत करुन मार्गक्रमण करावे लागते.

तसेच सध्या सर्वत्र साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. ह्या डबक्यारुपी तलावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते..

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे जबाबदार अधिकारींना सावळदे ग्रामपंचायतीने 25/8/2020ला निवेदन देऊनही अधिकारी डोळेझाकुन लोकांच्या जिवाशी खेळत आहे.

जर का अधिकारी असेच मनमानी करत असतील तर परिसरातील नागरिक चक्काजाम आंदोलन करतील असा ईशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने