*यावल येथे स्वराज्य ध्वज यात्रेचे पूजन*
यावल दि.१३(प्रतिनिधी):
मा. आमदार श्री रोहित पवार (कर्जत जामखेड विधानसभा ) यांचे संकल्पनेतून.आपला भारत देश समृद्ध वैभवशाली ऐतिहासिक संस्कृती असलेला देश आहे. महाराष्ट्रातील कर्जत जामखेड मध्ये ही अभिमानाने मान उंचावी असा अनेक परंपरा व ठिकाणे आहेत. खर्द्याजवळ चा विशाखापट्टन किल्ला हा त्यापैकी एक होय. याच किल्याजवळ स्वराज्यची शेवटीची लढाई झाली होती व शूर मावळयांनी शत्रूला धूळ चारून भगवा फडकवीला होता. याच किल्यावर दसऱयाच्या मुहूर्तावर स्वराज्य ध्वजची प्रतिस्थापना होत आहे तत्पूर्वी महाराष्ट्रसह देशतील 74 महत्वाच्या तसेच धार्मिक स्थळ स्मारक, गड ,किल्ले या ठिकाणी ध्वजाचे पूजन होणार आहे या ध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे 74 मिटर उंचीचा हा ध्वज महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात उंच भगवे प्रतीक असणार आहे महत्त्वाचे म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सहा जून 1674मध्ये झालेल्या राज्य भिषेक काचे स्मरण म्हणून ध्वजची उंची 74 मी. ठेवण्यात आली आहे . स्तंभाचे वजन 18 टन. वजन 90 किलो आकार 96x 64 फूट आहे या ध्वजाचे पूजन सर्वांच्या हस्ते व्हावे म्हणून हा ध्वज 37 दिवसांच्या प्रवासात सहा राज्य, मधून 12 हजार किलोमीटर प्रवास करणार आहे या दरम्यान विविध धार्मिक स्थळे येथे प्रतिनिधिक पूजन होऊन दसऱयाच्या मुहूर्तावर दि 15 आक्टोब.2021 रोजी हा ध्वज उभारला जाईल. आज रोजी हा ध्वज रथ यावल शहरांत आला असता. राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष श्री मुकेश येवले सर यांचे हस्ते पूजन करण्यात आले तसेच श्री अमोल दुसाने. श्री अरुण लोखंडे . शेख गणी . बापू जासूद. डॉ. हेमंत येवले. श्री बोदडे नाना. व इतर कार्यकर्ते व मान्यवर उपस्तितीत होते यांनी ही पूजन करून ध्वज रथ मार्गस्थ करण्यात आला...

