राळेगाव तालुक्यातील प्रतप्रधान आवास प्रपत्र ड यादीतून २६३३ कृटुब अपात्र..राळेगाव येथील तहसिलदार डॉ. रविंद्र कानडजे यांनी केली घरांची पाहणी
यवतमाळ दि.२९(जिल्हा प्रतिनिधी शेख राजिक )
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा सर्व २०११ मध्ये करण्यात आला होता त्यावेळी राळेगाव तालुक्यसह संपुर्ण जिल्ह्यातील पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहीले होते
त्यावेळेस शासनाने वंचित राहीलेले लाभार्थी यांंना पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे परिपत्रक ड यादी अस्तित्वात आनुन अज करण्यास सांगितले जनतेने ड यादीसाठी अजऺकेले परिपत्रक ड यादीची पंचायत समिती जिल्हा परिषद लेवल वरून सर्व करण्यात आले, राळेगाव तालुक्यात जवळपास १८२८३ कुटुंबातील सर्व करण्यात आले काही दिवसांपूर्वी जिओ ट्रेकिंग सुध्दा करण्यात आले त्यावेळी सुद्धा १८२८३ ईतकी कुटुंबाची यादी होती मात्र काही दिवसांपूर्वी पात्र ठरलेली कुटुंबाची यादी १५६५० येवठी करण्यात आली आणि सिस्टिम ने रिजेव्ट केलेली कुटुंबाची यादी २६३३ दाखवीण्यात आली आहे सिस्टिम ने २६३३ कुटुंब रिजेव्ट का केले हा प्रश्न जनतेला पटला,
पंचायत समिती राळेगाव यांच्या मार्फत जनतेला असे सांगितले गेले कि तुमचे घरे पक्की असतील, तुमच्या घरी टुव्हिलर असतील, किंवा तुमचे घरी दोण खोल्या असतील म्हणून तुमचे घर रिजेव्ट करण्यात आले आहे, असे उत्तर गोर गरीब जनतेचे प्रशासनाकडून मिळाले
मात्र प्रशासनाने जनतेला पक्के घर म्हणजे काय याचे उत्तर जनतेला देणे अपेक्षित आहे
अनेक गोर गरीब जनतेच्या घरावर टिन पत्रे आहे हे घर पक्के समजायचे का,मग साल्पं असणारे घरे कंचे समजायचे का
असा प्रकार राळेगाव तालुक्यातील अनेक गावांत घडलेला आहे ज्या गोरगरीब जनतेजवळ शेती नाही मंजुरी करतात, रहायला घर नाही ती व्यक्ती घरकुलापासुन वंचित आणि ज्यांच्या जवळ शेती राहायला साल्फचे घर आहे ती व्यक्ती पात्र लाभार्थी यादी मध्ये यालाच शासनाची सिस्टिम मणायची का हा प्रश्न जनतेला पटला आहे राळेगाव तालुक्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या घोटाळ्याला जबाबदार कोण,
मात्र घोटाळ्यामुळे सामान्य गोरगरीब जनता भरडली गेली आहे हे मात्र विषेश
राळेगाव येथील तहसिलदार डॉ.रवीद्र कानडजे यांनी धानोरा येथील गरिबी जनतेच्या घराची पाहणी करून जनतेला आधार दिल्या मुळे जनता आनंदी झाली आहे