गुणवंत नामवंत रत्नपारखी रसिक राज....लोककला अकादमी मुंबई विद्यापीठचे प्रा.डॉ. गणेश चंदशिवे

 



गुणवंत नामवंत रत्नपारखी रसिक राज....लोककला अकादमी मुंबई विद्यापीठचे प्रा.डॉ. गणेश चंदशिवे 

"नाते कलेचे त्या रक्ताशी"

या लेख मालेचे आकर्षण हिंदी,मराठी, लोकगायक , विभाग प्रमुख लोककला अकादमी मुंबई विद्यापीठचे प्रा.डॉ. गणेश चंदशिवे होय. त्यांचे गाव टेंभुर्णी ता.जाफराबाद, जि.जालना येथील असून आईचे नाव मंदाबाई आहे. प्रा.डॉ.चंदनशिवे यांच्या घराण्याला वडिलोपार्जित तमाशा कला अवगत होती.

पूर्वी तमाशा मध्ये स्त्रिया काम करीत नसून पुरुष नाचण्याचे काम करीत होते. 

प्रा.डॉ.चंदनशिवे यांचे बाबा संपतराव हे नाचकाम करून रसिकांना मोहित करीत. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतर चळवळ सुरू झाली. म्हणुन ते बीड जिल्ह्य़ातुन जालना जिल्ह्य़ात आले. त्यांच्या वडिलांचे शिक्षण जाफराबाद येथे सुरू झाले. 

आणि हळूहळू शंकरबाबा यांचा तमाशा बंद पडला. 

बाबा शिक्षक म्हणून १९६२ साली पिंपळगाव,ता.अंबड येथे रुजू झाले. संपतराव यांचा विवाह मंदाबाईशी झाला. माता.मंदाबाईच्या उदरी ४ मुलांनी जन्म घेतला. 

प्रा.चंदनशिवे यांचा जन्म ५ जुलै १९७७  ला चंदनशिवे घराण्यात झाला. 

प्रा.चंदनशिवे यांचे सगळे सख्खे चुलत भाऊ मिळून ३५जणांचे कुटुंब आहे. 

प्रा.डॉ.चंदशिवे म्हणतात वडिल शिक्षक असल्यामुळे ते कष्टाने पदवीधर झालेत. 

नंतर वडिल वारले. त्या वेळी प्रा.डॉ.चंदनशिवे हे दहावीत होते. वडिलांना पगार कमी असल्याने खर्च भागत नव्हता. म्हणून ते शेतात बकर्‍या चारणे, साल महिने घालणे ,दवाखान्यात सफाई कामगार म्हणून काम करणे, वेळ भेटला की मुंबईत येऊन बिगारी काम करणे

उन्हाळ्यात तमाशात जाऊन संत्रा, गोळ्या, पोंगापंडित,पापड विकणे ही सर्व कामे  प्रा.डॉ.चंदनशिवे यांनी केलीत. तसेच  मा. भिका भीमा,विश्वास साळुंखे पाटील अशा गमत्या ग्रुप मध्ये काम केले. नंतर जरीनाबाई सय्यद, हिराबाई औरंगाबादकर,कांता बाई जाधव, उषाबाई पाटील, गीता महाजन, संजीवनीमुळे नगरकर ,शाहीर शेषेराव पठाडे, डॉ.रुस्तुम यांच्या बरोबर लोक नाट्यातुन प्रा.डॉ.चंदनशिवे यांनी काम केले आहे. हे सर्व करून सुद्धा त्यांचे शिक्षण चालूच होते. 

पण जगण्याचे साधन म्हणजेच  जत्रा, यात्रा च्या ठिकाणी तमाशाच होता. अस म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.जाफराबादच्या महाविद्यालयात पदवी प्राप्त करून कला क्षेत्रात सुवर्णपदक पटकावले हे प्रा.डॉ. चंदनशिवे यांना मिळालेली मोठे फळ आहे. 

प्रा.डॉ. चंंदनशिवे यांचे  शिक्षण B.A.Be.d नाट्य शास्त्र, MD नाटय शास्त्र, PHD झालेले आहे.तमाशाच्या सादरीकरणाचे बदलते रूप जग भरात बर्‍याच देशात फिरून लोक कलेचा प्राचार व प्रसार त्यांनी केला आहे. 

 तसेच मराठी, हिंदी चित्रपटात प्रा. डॉ. चंदनशिवे गायन सुद्धा करतात.त्यांनी अनेक दिग्गज कलावंताबरोबर कला सादर केलेली आहे. तसेच महाराष्ट्राची परंपरा लोक संस्कृतीवर आधारित कार्यक्रमातून सहभाग घेतात.आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच राज्यस्तरीय मानाचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मिळाला आहे.

आज त्यांचे नाव महाराष्ट्रामध्ये गाजत असून कलेसाठी, कलावंतासाठी आणि कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान ते देत आहे. त्यांची राहणी साधी भोळी,उच्च विचार, रसिकावरील प्रेम करून कलावंतांना सहकार्य करून, सर्वाच्या सुख दुःखात सहभागी असतात. 

प्रा.डॉ. चंदनशिवे यांना लाभलेल्या गावरान खडया आवाजाच लेण ,गळ्यातील गोड गाण ,लावण्या

ऐकतांना रसिकांच जाते देहभान हरपून.

आजच्या तरूणपिढीने प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा .जीवनातील पडत्या काळात खचायचे नसते आणि यशाने स्थिर रहायचे असते.त्यातून जीवन घडवायचे याचे मार्गदर्शनाची जीवनदृष्टी नक्कीच लाभेल.एक तमासगीराचे पोर जिद्दीने ,धडपडीने  ,ज्ञान ,गुण ,यश किर्तीने किती मोठे होते हे तमाशाकलेला निश्चित अभिमान वाटेल असेच असेल.

खरच.... 

प्रा.डॉ गणेश चंदनशिवेसर आपण केलेल्या रसिकांच्या सेवेला, कलेला आणि तुम्हाला मनाचा मुजरा,अशीच तुमच्या हातून कलावंताची, रसिकांची,देशाची सेवा घडो .तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमचे नाव महाराष्ट्रामध्ये अजरामर राहो, हीच ईश्वरा चरणी प्रार्थना. 

लेखक. 

शाहीर खंदारे. 

ता.नेवासा. 

मो.8605558432

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने