गणपती विसर्जना वेळी पाण्यात बुडून तिघांचा दूर्दैवी मृत्यू ..वडतीच्या न्हावी कुटुंबीयांवर काळाचा घाला
चोपडा दि.१२ (प्रतिनिधी):--वडती ता चोपडा येथील रहीवाशी दगा बाबुराव न्हावी यांचा मुलगा डिगाबंर दगा न्हावी हे कामानिमित्त गुजरात राज्यामधील किम या शहरात राहण्यास गेले होते. घरात पती, पत्नी व दोन मुले असा लहान परिवार हे किम या ठिकाणी वास्तव्यास होते. सोबत या ठिकाणी त्यांचे साडू बापू ठाकरे पारोळेकर हे पण कामानिमित्त या "किम" ठिकाणी वास्तव्यास होते.
त्यानी आपल्या घरी दिड दिवसाचा गणपती बसवलेला होता. आज "श्री" चे विसर्जन असल्याने त्यासाठी स्थानिक किम नदीवर गेले असता डिगाबंर यांचे दोन्ही मुले लहान मुलगा अक्षय (वय १४) व मोठा मुलगा रोहीत (वय १७ ) सोबतीस साडू व साडूचा विवाहीत मुलगा संभाजी (वय २८ ) ) सोबत दोघ साडू असा परिवार दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान गणपती विसर्जनाला किम नदीवर आले होते. विसर्जनावेळी डिगाबंर यांचा लहान मुलगा अक्षय याचा पाय अचानक घसरल्याने त्याचा तोल जावून पाण्यात पडला हा प्रसंग मोठा भाऊ रोहीत याच्या दृष्टीस पडताच खेरीज बुडत असलेल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्नात तो धावत नदीकडे धावला परंतू पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो ही बुडत असल्याचे पाहून त्याचा मावस भाऊ संभाजी (साडूचा विवाहीत मुलगा ) हा ही वाचविण्या साठी धावला परंतू तो ही पाण्यात डुबत गेला. आणी तिघा भावांचा पाण्यात बुडून अत्यंत दुर्दैवी म्युत्यू झाला. अत्यंत ह्रदयपिटवून टाकणारी घटना आज दोन्ही परिवारावर घडली आहे.
या पैकी विवाहीत तरूण संभाजी याची मृतदेह शोधकार्यास मिळून आला आहे. शव विच्छेदनासाठी किम येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. या तरूणास आई वडील, भाऊ, पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे .
दोघ सख्या भावांचे मृतदेह आज सांयकाळ पर्यंत हाती लागले नव्हते शोध कार्य सुरू होते. हि बातमी वडती गावात कळताच सर्वाना धक्काच बसला दोन सख्ये भाऊ व घरातील भावी पिढीचा वारसाच गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.