शिंदखेडा शहरात जिथे समस्या तिथे काँग्रेस गटनेते दिपक देसले सह नगरसेवकाची मोहीम आज वार्ड क्रं ९ मधील लेंडी नाल्याची दुर्दशा कायम व ओम कलेक्शन जवळील मुख्य रस्त्यावर गटारी तुंबलेल्या अवस्थेत नगरपंचायत चे दुर्लक्ष रोगराई ला आमंत्रण *






 



*शिंदखेडा शहरात जिथे समस्या तिथे काँग्रेस गटनेते दिपक देसले सह नगरसेवकाची मोहीम आज वार्ड क्रं ९ मधील लेंडी नाल्याची दुर्दशा कायम व ओम कलेक्शन जवळील मुख्य रस्त्यावर गटारी तुंबलेल्या अवस्थेत नगरपंचायत चे दुर्लक्ष रोगराई ला आमंत्रण  *                          

  शिंदखेडा दि.१३( तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत )  धुळे जिल्ह्य़ातील शिंदखेडा तालुक्यात नगरपंचायत शहरातील अनेक वार्डनिहाय कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष म्हणजे खुद्द काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे *शिंदखेडा शहरातील वार्डनिहाय समस्या*- शहरात चाललेल्या गैर कारभाराविषयी काँग्रेस चे प्र नगराध्यक्ष तथा गटनेते दिपक दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक तथा प्रतोक दिपक अहिरे, नगरसेवक उदय देसले ,संगीता किरण थोरात ,संगीता चंद्रकांत सोनवणे, स्विकृत नगरसेवक सुमित जैन यांनी जिथे समस्या तिथे  काँग्रेस वार्डनिहाय मोहीम सुरू केली आहे. सुरू झालेल्या आज पाचव्या  *वार्ड क्र.९* मधील  विविध प्रकारच्या कामात नगरपंचायतने दुर्लक्ष करून नागरिकांना कायमची समस्यांना सामोरे जावे लागत आहे.हयात मुख्यता खरेदी विक्री संघ परिसरातील लेंडी नाल्याची दुर्दशा कायमची होऊन बसली आहे.शहरातुन वाहणारा लेंडी नाला दीड ते दोन किमी चा असुन या नाल्यात गाळ साचल्याने दुर्गधीचा त्रास नालाकाठी राहणा-या रहिवाशांना होतो.येथील पंचायत समितीपासुन सुरू होवून सिंधी कॉलनी, विवेकानंद काॅलनी, बसस्थानक परिसर ,जनता हायस्कूल परिसर .स्टेशन रोड, खरेदी विक्री संघ परिसर , नेताजी नगर विरदेल रोड,दयाराम नगर,वरपाडा रोड,बुराई नदी असा नाल्याचा मार्ग आहे.फक्त जनता हायस्कूल पर्यतच नाल्यांची साफसफाई केली जाते.स्टेशन रोड परिसरात अतिक्रमण असल्याने अवघड जागेवर नाल्यांची साफसफाई केली जात नाही.परिसरात कायमची दुर्गधी असते.त्यामुळे डास ,मच्छर डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.त्या पासुन विविध प्रकारच्या रोगराईला रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी नगरपंचायत ला तोंडी व लेखी निवेदन देवून ही नगरपंचायत सत्ताधारी झोपेचे सोंग घेत आहेत.दरवर्षी नगरपंचायत हयासाठी लाखो रुपये केवळ नाल्यवर खर्च करत असते.त्यातही सत्ताधारी भ्रष्टाचार करत आहे.नुकताच डेंग्यू आजाराने थैमान घातले असताना ज्याचा परिणाम येथील रहिवाशांना फटका बसु शकतो.हा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतातरी कुंभकर्णी नगरपंचायत ने काम हाती घेवून कायमस्वरूपी हा लेंडी नाल्याचा प्रश्न मार्गी लावावा.अन्यथा येथील नगरसेवक सुनील चौधरी यांच्या सह रहिवाशांचा तीव्र स्वरुपाचा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तसेच ह्याच वार्डातील स्टेशन रोड परिसरात ओम कलेक्शन जवळील मुख्य रस्त्यावर गटार तुंबलेल्या असुन त्याचे पाणी परत घरामध्ये येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे अशी तक्रार नगरसेवक सुनील चौधरी यांच्या सह सुरेश जैन, बाळकृष्ण बोरसे , डॉ.टाटिया , गिरीश देसले , यांसह रहिवाशांनी केली आहे.हा गंभीर विषय मार्गी लागला नाही.अन्यथा नगरपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल.एकंरीत वार्ड क्रं.९ मधील दोन समस्या गंभीर झालत्या आहेत.हया संबंधित दोषी सत्ताधारी .नगराध्यक्षा व मुख्याधिकारी  यांच्यावर कारवाई करण्यात यावी..हयाप्रसगी ,गटनेते दिपक देसले , विरोधी पक्षनेते सुनील चौधरी , नगरसेवक दिपक अहिरे , उदय देसले स्विकृत नगरसेवक सुमित जैन चंद्रकांत सोनवणे किरण‌ थोरात दगा माळी यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.संबधित वार्डातील प्रश्न न सोडविण्यास जिल्हाधिकारी कडे पाढा वाचून निदर्शनास आणून मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार विरोधी काॅग्रेस व  शहरवासियांतर्फ पुढील काळात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेस चे गटनेते दिपक देसले यांच्यासह केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने