केंद्र शासनाची देश आणि शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडा.....कॉ. जे पी गावीत*
नाशिक दि.२७ (प्रतिनिधी)*केंद्र सरकारच्या दिवाळखोर, देशबुडव्या, शेतकरी विरोधी कायद्याच्या,. विषारी धोरणाच्या आणि जनतेच्या जीवघेण्या धोरणाच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेनुसार आज सुरगाणा तालुक्यातील बोरगांव येथे कॉ जे पी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉ जनार्दन भोये यांच्या नेतत्त्वाखाली रास्ता रोको* .*तर सुरगाणा येथे कॉ. जे पी गावीत ,कॉ.सुभाष चौधरी,सावळीराम पवार,रामजी गावीत यांच्या नेतत्वाखालील कडकडीत बंद पुकारुण १० हजार शेकर्यांची प्रंचड जाहीर सभा घेण्यात आली.*
गेल्या काही वर्षात केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी कामगार शेतमजूर महिला सरकारी नोकरवर्ग युवक विद्यार्थी यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आणि मूठभर लोकांच्या हितासाठी फायद्यासाठी देशाच्या सत्तेचा वापर करून देशाचे दिवाळे काढले आहे, देश संकटात टाकला आहे, देशातला संपूर्ण शेतकरी संकटात आहे, शेतीला भाव नाही, बागायती पिकाला भाव नाही, शिक्षण क्षेत्राकडे केन्द्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष्य केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थांचे मोठे नुकसान झाले आहे, दोन पिढ्या बरबाद झाल्या आहेत या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, हे देशातील सरकारचे दुर्दैव आहे,
देशातील संबंध युवा पिढीला रोजगार आणि नोकरी ची खुप आश्वासने दिली, युवा पिढीला नोकरीची खोटी आश्वासने देऊन फसविले, देशात बेकारीची समस्या या सरकारने वाढविली आहे, त्यामूळे देशातील तरुण युवा वर्ग चुकीच्या गोष्टीकडे वळत आहे.
ग्रामीण भागांतील अनेक प्रश्न नागरिकांना सतावत आहेत प्रशासन मात्र सुस्त आहे. सुरगाणा तालुक्यातील गरीब जनतेचा सर्वात महत्वाचा प्रश्न हा वनपट्ट्याचा आहे. कायदा मंजूर होऊनही केंद्र आणि राज्य शासन वनपट्ट्याचा प्रश्न निकाली काढत नाही. वनजमिनीचा तुकडा ताब्यात देऊन स्वतंत्र सातबारा त्या व्यक्तीच्या नावे द्यावा यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढले पण सरकार जमिनीच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. यासाठी परत एकदा शासनावर जोरदार आंदोलन करुण शासनाला जाब विचारावा लागणार आहे. यासाठी परत एकदा संसद आणि विधान भवनावर लाँग मार्च सारखा मोर्चा न्यावा लागणार आहे, यासाठी सर्व जनतेने जिद्दीने सहभागी व्हावे असे आवाहन केले तालुक्यातील जनतेला पेन्शन योजना मिळण्यास अनेक अडथळे आणले जात आहेत, रेशन कार्ड समस्या मोठी आहे,
घरकुल योजनेसाठी लाभधारकंना वंचीत ठेवले आहे हा जनतेला दिलेला त्रास आम्ही जणता सहन करणार नाही. वंचीत घरकूल लाभधारकांना त्वरित घरकुले मंजूर करून त्यांना तीन लाखाचे अनुदान द्या असे शासनाला ठणकावले.
येणाऱ्या काळात तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नासंदर्भात तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने पुढाकर घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, जनतेचे सर्व प्रश्न सोडवावेत तरच आपल्या जनतेचा विकास होईल, लहन मोठे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी युवकांनीहि पुढाकार घेईन पुढे निघावे असे आव्हान केले.
*यावेळी सुरगाणा पंचायत समिती सभापती इंद्रजीत गावीत , माजी जी. प. सदस्य कॉम.जनार्दन भोये , माजी सभापती उत्तम कडू , माजी सभापती,सावळीराम पवार , वसंतराव बागुल यांनी मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या सरकारवर जोरदार हल्ला चढवत शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधातील निर्णयाबाबत जोरदार निषेध केला.*
या बंदसाठी तालुक्यातील आठ ते दहा हजार शेतकरी बंधू बहिणी उपस्थित होते. पंचायत समिति सदस्य कॉम विजय घांगळे, कालाबई भोये, माजी सभापती मनीषा महाले, मंदाकिनी भोये, माजी सभापती कॉम रामजी गावीत, मार्केट कमिटी उपसभापति कॉ पुंडलिकभोये, धंजी चौधरी,कॉम.सुरेश गवळी, राहुल आहेर धर्मेंद्र पगारिया, दीपक थोरात, राजू बाबा, अकील पठाण, योगेश थोरात, सुरेशभाऊ गवळी,संजाबाई खंबाईत, निर्मलाताई चौधरी,भारती चौधरी,भारजबाई केंग,गांगोडाबाई, सरपंच मेनका पवार,रोहिणीताई वाघेरे, त्र्यंबक ठेपणे, संस्कार पगारिया, तुळशीराम खोटरे,दानेल गांगुर्डे, मोहनराव पवार, चंद्रकांत वाघेरे, लिलाधर चौधरी,भागवत गायकवाड, राहुल आहेर,देवा हाडळ, पांडुरंग गायकवाड, सुभाष भोये,कान्हा हिरे, अशोक धुम, नितीन गावीत, राहुल गावीत,तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सुरगाणा नगर पंचायत नगराध्यक्ष, नगरसेवक , किसानसभा , जनवादीमहिला संघटना, DYFI संघटना, sfi संघटना, युवा कार्यकर्ते महिला व तालुक्यातील बहुसंख्य नागरीक मोठ्या उपस्थित होते.अशी माहिती.कॉ.भिका हरि राठोड ता.सेक्रेटरी किसान सभा**कॉ.रामजी गावीत ता.अध्यक्ष किसान सभा यांनी दिली आहे