भुसावळ शहरात कॉग्रेस कमिटी* चा *भारत बंद मध्ये* *सहभाग
भुसावळ दि.२७(प्रतिनिधी)
*भुसावळ शहरात कॉग्रेस कमिटी* चा *भारत बंद मध्ये* *सहभाग व पाठिंबा शेतकरी* *विरोधी तिन काळे कायदे,* कामगार विरोधी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी संघटना व डाव्या पक्षांनी 27सप्टेबरला पुकारलेल्या भारत बंद ला कॉग्रेस पक्षाने सक्रिय पणे सहभाग घेवून पाठिंबा दिलेला आहे. केद्रातील मोदी सरकारने लादलेले तिन कृषी कायदे रद्द करावे. एक वर्षापासून दिल्ली च्या सीमेवर लाखो शेतकरी ठाण मांडुन बसलेले असुन या आंदोलनात पाचशे शेतकरी मुत्यु मुखी झालेले असुन भाजपा सरकारने यांची. दखल घेतलेली नाही. या काळया कृषी कायद्याने देशातील शेती, व शेतकरी उध्वस्त करून भांडवल दाराचे गुलाम बनविण्याचे काम मोदी सरकार करीत आहे त्याचप्रमाणे केद्रातील कामगारांना उध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. देशातील कॉग्रेस सरकारने निर्माण केलेले संस्थान मोदी सरकार आपल्या मित्रांना विकण्याचे काम करीत आहेत. यांचा आम्ही कॉग्रेस पक्षा तफै जाहीर निषेध करीत आहोत. अश्या प्रकारचे निवेदन भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी तफै प्रांत अधिकारी यांना *शहर कॉग्रेस* *कमिटी चे अध्यक्ष रविंद्र निकम* *जिल्हा अल्पसंख्याक* *अध्यक्ष मुन्वर* *खान, प्रदेश संयोजक* *भगवान भाऊ मेढे* , *प्रदेश महिला सचिव* *अनिता ताई खरारे* , महिला शहर अध्यक्ष यास्मिन बी, जिल्हा महिला सचिव राणी ताई खरात शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात यांनी निवेदन दिले यावेळी कॉग्रेस शहर उपाध्यक्ष राजेश डोंगरदिवे, महेंद्र महाले, सुखदेव सोनवणे, अजगर भाई, प्रदिप नेहते, शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण, दुर्गा सोनवणे, फरिदा शहा अतुल पान पाटील, मुकुंद नामदेव,शेख साहब, पटेल टी सी इत्यादी कार्यकतै उपस्थित होते